तुमची लहान मुलंही Reels पाहतात का? नवीन रिपोर्टमधून मोठा धोका आला समोर  | टेक्नोलॉजी मराठी बातम्या


Last Updated:

Instagram Reels: आजच्या काळात घराघरात स्मार्टफोन आले आहेत. यावर इंस्टाग्राम रील्स पाहणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. यात मोठे लोक रील्स पाहतातच पण लहान मुलंही याच्या आहारी जात आहेत.

चाइल्ड रील अॅडिक्शन
चाइल्ड रील अॅडिक्शन

Instagram Reels: आजच्या काळात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात रील्सवर तासंतास घालवणं खुप कॉमन झालंय. फक्त मोठे लोकंच नाही तर लहान मुलंही या रील्सच्या आहारी केले आहेत. यावर लहान मुलंही आपल्या घरातील कोणाचाही फोन घेऊन तासंतास इंस्टाग्राम रील्स पाहतात. कारण आजच्या काळात लहान मुलांमध्येही स्मार्टफोनची क्रेझ वाढतेय. आता एका रिपोर्टमध्ये समोर आलंय की, रील्स पाहिल्याने लहान मुलांच्या मेंदूवर मोठा परिणाम होतो.

जास्त रील्स पाहिल्याने वाढतोय तणाव 

जर्मनीच्या यूनिव्हर्सिटी ऑफ बायरॉथच्या संशोधकांनी केलेल्या एका रिसर्चमधून समोर आलंय की, सतत शॉर्ट व्हिडिओ पाहण्याची सवय मुलं आणि तरुणांमध्ये तणाव वाढवण्याचं काम करत आहे. एवढंच नाही तर असं केल्याने त्यांचा फोकसही कमी होतोय. हा रिसर्च जूनमध्ये European Child & Adolescent Psychiatry जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.वैज्ञानिक म्हणतात की, जगभरात आज तरुण आपला जास्तीत जास्त वेळ शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर घालवत आहे. असं केल्याने त्यांच्या मेंदूवर आणि वागण्यावर वाईट परिणाम पडतोय. ज्यामुळे आता यावर लक्ष देणं गरजेचं झालंय.

ही आहेत तीन कारणं

या रीसर्चमध्ये तीन मोठी कारणं समोर आली आहेत. ज्यामुळे मुलं आणि तरुण रील्स पाहण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही.

  1. पहिलं म्हणजे एकामागून एक नवीन कंटेंट आल्याने यूझर्स त्यातच अडकून राहतो आणि प्लॅटफॉर्म सोडू शकत नाही.
  2. दुसरं म्हणजे Infinite Scrolling जी कधीच संपत नाही.यामुळे लोकं सतत स्क्रोल करत राहतात आणि आपले तासंतास यातच वाया घालवतात.
  3. तिसरं कारण म्हणजे, यूझर आपल्या आवडीनुसार कंटेंट दाखवणारा पर्सनलाइज्ड एल्गोरिदम आहे. हे लोकांना तेच कंटेंट दाखवते जो त्यांना पाहायला आवडतं. याचं सर्वात मोठ्या कारणामुळे लोकं या प्लॅटफॉर्मपासून दूर राहू शकत नाही.
एवढ्या लोकांवर झाला रिसर्च 

या रिसर्चमध्ये 42 वेगवेगळ्या रिसर्च ग्रुपचं अॅनालिसिस केलंय. या रिसर्चमध्ये जवळपास 47 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यांचं सरासरी वय 16 वर्षे आहे. या रिसर्चमध्ये घर, स्कूल आणि इतर पब्लिक प्लेसवर डिजिटल मीडियाच्या वापराविषयी अभ्यास करण्यात आला. ज्यानंतर कळलंय की, शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मला अशा प्रकारे तयार केलंय की, लोक त्यापासून दूर राहू शकत नाहीत. प्रत्येक सेंकदाला नवीन व्हिडिओ आल्याने लोक प्लॅटफॉर्मला चिटकून राहतात आणि लवकर दूर होऊ शकत नाहीत.

यापासून मुलांना दूर कसं ठेवावं?

संशोधक मानतात की, पालक आणि कुटुंबाला आपल्या मुलांसाठी निरोगी डिजिटल वातावरण तयार करा आणि मोबाईल वापराची एक वेळ ठरवा. ज्यामुळे या धोक्यांपासून बचाव करता येऊ शकतो. यासह मुलांना स्मार्टफोन ऐवजी बाहेरचं जग दाखवा. ग्राउंडमध्ये फिजिकल अॅक्टिव्हिटी किंवा खेळात सहभाग घेतल्याने हे वेगाने रिकव्हर होतं. एवढंच नाही तर मुलांसोबत कुटुंबाने जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. ज्यामुळे त्यांचं सोशल मीडिया किंवा स्मार्टफोनवर अवलंबित्व कमी होऊ शकेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *