5 Bollywood Stars Who Rule Instagram: आज सोशल मीडिया (Social Media) हे केवळ फोटो किंवा अपडेट्स शेअर करण्याचे माध्यम राहिलेले नाही, तर सेलिब्रिटी (Celebrity) आपल्या चाहत्यांशी त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वातून जोडले जाण्याचे एक (Entertainment) प्रभावी व्यासपीठ बनले आहे. काही जण प्रेरणा देतात, काही मनोरंजन करतात, तर काहींनी आपल्या वेगळ्या डिजिटल ओळखीमुळे सोशल मीडियावर खास स्थान निर्माण केले आहे. ‘वर्ल्ड सोशल मीडिया डे’ निमित्त जाणून घेऊया अशा पाच बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल, ज्यांनी आपल्या मजेशीर, रंजक आणि ओरिजिनल कंटेंटच्या जोरावर इन्स्टाग्रामला अधिक मनोरंजक बनवले आहे.
विद्या बालन – प्रत्येक रीलमध्ये अभिनयाची जादू (Bollywood actresses on Instagram)
ट्रेंडिंग डायलॉग्सवर लिप-सिंक असो, व्हायरल ट्रेंड्सना स्वतःच्या शैलीत सादर करणे असो किंवा एखाद्या ऑडिओ क्लिपला आपल्या अभिनयाने नवा रंग देणे असो, विद्या बालनच्या प्रत्येक रीलमध्ये अप्रतिम एक्सप्रेशन्स, अचूक टाइमिंग आणि नैसर्गिक आकर्षण पाहायला मिळते. त्या केवळ ट्रेंड्स फॉलो करत नाहीत, तर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांना संस्मरणीय बनवतात.
शिल्पा शेट्टी – रविवारीचा दिवस केला सेलिब्रेशन
शिल्पा शेट्टीचे सोशल मीडिया अकाउंट फिटनेस आणि खाद्यप्रेम यांचा सुंदर संगम आहे. एका बाजूला त्या आपल्या वेलनेस टिप्सद्वारे लोकांना प्रेरित करतात, तर दुसऱ्या बाजूला त्यांची लोकप्रिय ‘संडे बिंज’ मालिका चाहत्यांसाठी दर आठवड्याचा खास आकर्षण ठरते. मिठाईपासून स्ट्रीट फूड आणि घरगुती स्वादिष्ट पदार्थांपर्यंत, शिल्पा संतुलित जीवनशैली म्हणजे प्रत्येक गोष्टीचा समतोल साधणे, हा संदेश देते.
कुब्रा सैत – ‘गुड मॉर्निंग ह्युमन्स’ने पसरवते आनंद
कुब्रा सैतने आपल्या खास शैलीत आणि ‘गुड मॉर्निंग ह्युमन्स’ या सिग्नेचर अभिवादनामुळे इन्स्टाग्रामवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे मजेशीर निरीक्षणांमुळे, दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींवरील भाष्यामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे तिचा कंटेंट प्रेक्षकांना सहज आपलासा वाटतो. तिचा प्रामाणिकपणा, साधेपणा आणि सकारात्मक ऊर्जा प्रत्येक पोस्टला मैत्रीपूर्ण स्पर्श देतात.
श्रद्धा कपूर – इंटरनेटवरील सर्वात गोड ‘गर्ल नेक्स्ट डोअर’
श्रद्धा कपूरची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तिचा साधेपणा आणि सहज रिलेट होणारे व्यक्तिमत्त्व. मजेशीर रील्स, फनी डान्स व्हिडिओज आणि शूटिंगमागील खास क्षण शेअर करून त्या कोणताही दिखावा न करता चाहत्यांची मने जिंकतात. तिचा सहजस्वभाव आणि हलकाफुलका कंटेंट तिला सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनवतो.
सारा अली खान – ‘नमस्ते दर्शकों’ची हटके स्टाईल
सारा अली खानने आपल्या प्रसिद्ध ‘नमस्ते दर्शकों’ या आगळ्यावेगळ्या इंट्रोमुळे सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ट्रॅव्हल व्लॉग्स, कुटुंबासोबतचे क्षण, शूटिंगमागील खास व्हिडिओ आणि मजेशीर कविता आणि यमकांच्या माध्यमातून त्या प्रत्येक पोस्टमध्ये नवी ऊर्जा आणतात. तिची वेगळी स्टोरीटेलिंग शैली आणि चुलबुला स्वभाव बॉलिवूडमधील सर्वात मनोरंजक सोशल मीडिया पर्सनॅलिटींपैकी एक बनवतो.
या पाचही अभिनेत्रींनी हे सिद्ध करून दाखवले आहे की, सोशल मीडिया हे केवळ फॉलोअर्स वाढवण्याचे साधन नसून, स्वतःचे खरे व्यक्तिमत्त्व जगासमोर मांडण्याचे आणि चाहत्यांशी अधिक घट्ट नाते निर्माण करण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
लव्ह ट्रँगल ठरला सुपरहिट! ‘कॉकटेल 2’ या सिनेमाची सोमवारीही उत्तम कामगिरी, किती कोटी कमावले?
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा