Operation Tiger Om Raje Nimbalkar: महाराष्ट्रात सध्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे (Operation Tiger) राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. ठाकरेंची शिवसेना पुन्हा एका मोठ्या पक्षफुटीच्या तोंडावर उभी आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून सहा खासदार शिंदे गटाने फोडल्याची चर्चा असताना ठाकरे सेनेचे निष्ठावंत समजले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) अखेर दिल्लीत दाखल झाले. मंगळवारी रात्री एक वाजता त्यांनी पुण्यातून दिल्ली विमानतळ गाठल्याची माहिती आहे. खासदार ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं जवळपास नक्की समजलं जात असताना काही तासांपूर्वी त्यांनी केलेल्या facebook Postवर अनेकांनी ” गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब’ अशा आशयाच्या कमेंटस केल्या आहेत.
ओमराजे निंबाळकर यांच्या फेसबुक पोस्टवर कमेंट्सचा पाऊस
ओमराजे निंबाळकर हे पवनराजे हत्याप्रकरणाच्या निकालासाठी मुंबईत आले होते. मात्र, न्यायालयाने निकालाची तारीख पुढे ढकलली. नंतर खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यात आले. ओपेरेशन टायगर’ च्या चर्चा सुरु झाल्यानंतर ओमराजे नेमके आहेत तरी कुठे? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर अनेकांना त्यांचा फोन बंद लागला. पण या सगळ्यावर त्यांनी कोणतेच सुतोवाच केले नाही. दरम्यान, ते दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. दरम्यान त्यांनी फेसबुकवर आज सकाळी एक VIDEO शेअर केला. यावर शिवसैनिकांच्या ‘गद्दारी करू नका” निष्ठा जपायची असते, विकायची नसते’ अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत.

ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार ओमराजे निंबाळकर आणि इतर नेत्यांना दिल्लीला नेण्यासाठी पुणे विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने २ खाजगी विमाने (Private Jets) पुणे विमानतळावर सज्ज ठेवण्यात आली होती. ओमराजे निंबाळकर यांच्या दिल्ली दौऱ्याचा प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता आणि काल दिवसभरात या विमानांच्या उड्डाणाच्या वेळेत तब्बल तीन ते चार वेळा बदल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.या विशेष विमानाने केवळ ओमराजे निंबाळकरच गेले नाहीत, तर त्यांच्यासोबत महायुतीचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत तसेच जय राजे निंबाळकर हे देखील दिल्लीला गेल्याची विश्वसनीय माहिती आहे.
हेही वाचा:
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
