Sandeep Pathak Share Fan Selfie Incident ; हॉटेलात जेवताना चाहत्यांने आणले नाकीनऊ, सेल्फीसाठी हट्ट; Sandeep Pathak ने सांगितला धमाल किस्सा


Sandeep Pathak Fan Moment : अभिनेता संदीप पाठकने नुकतीच महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला मुलाखत दिली. त्यात त्याने चाहत्यांसोबतचे काही किस्से शेअर केले.

sandeep pathak fan moment
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर आपला लुक किंवा दिसणं हे उत्तमच असलं पाहिजे हा समज खोडून काढणारे अनेक कलाकार आहेत. या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. असाच एक अभिनेता म्हणजे संदीप पाठक . संदीपला त्याच्या दातांवरून अनेकदा पूर्वी ट्रोल केले गेले होते पण नंतर त्याने आपल्या दातांवरच स्वतःहून विनोद करून लोकांना खळखळून हसवले. कधी विनोदी तर कधी गंभीर तर कधी गुढ अशा वेगवेगळ्या भूमिका साकारून संदीप पाठक यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. नुकतीच त्याने त्याच्या आगामी घबाड कुंड या सिनेमानिमित्त महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरला भेट दिली. या शोमध्ये त्याने त्याच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले.
Maharashtra TimesTharala Tar Mag : सचिनने मारली अशी थाप की आईवडील सहखुशीने वृद्धाश्रमात राहायला तयार, कोर्टातही अस्मितावर शेकले नको ते आरोप, अर्जुनला केस हरवण्याचं ओपन चॅलेंज
सध्याचा काळ हा प्रसिद्धीचा आहे. जो दिखता है वो दिखता है असे सध्या चालू असल्यामुळे कलाकारांना प्रसिद्धीसाठीही बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तर काहींना आपल्या कामांमधूनच ती प्रसिद्धी आपोआप मिळते. पण या प्रसिद्धीचीही दोन टोके आहेत. संदीप पाठक यांनी याबाबत सांगितले की, जेव्हा तुम्ही मनोरंजन सृष्टी मध्ये नाटकात, सिनेमात, मालिकांमध्ये, सोशल मीडियावर दिसता तेव्हा तुम्ही महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्र बाहेर जे ते मराठी माणसं आहेत तिथे गेला तर तुम्हाला ट्रीटमेंट अगदी छान मोठी मिळते रेड कार्पेट सारखी.

विमानातून प्रवास करत असतानाही एअर होस्टेस तुम्हाला ओळखतात आणि सर तुम्हाला हे घ्या वगैरे काहीतरी आणून देतात. हे पाहून त्या विमानातले फॉरेनर किंवा इतर मराठी लोक असतात त्यांना प्रश्न पडतो की हा कोण आहे याला एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट का मिळते. किंवा कधी कुठे हॉटेलमध्ये गेलो तरी ही लोक बिल घेत नाहीत. तुमचे पाय आमच्या हॉटेलला लागले एवढेच खूप आहे असं म्हणतात. बरेच लोक गिफ्ट्स वगैरे आणून देतात, आमचे चित्र काढतात… हा एक प्रसिद्धीचा फायदा आहे.

Maharashtra TimesJankee Parekh Breast Milk Donate : अभिनेता नकुल मेहताच्या पत्नीने दान केली ब्रेस्ट मिल्कची 90 पाकिटं, नवजात शिशु अतिदक्षता विभागतल्या मुलांना लेकीसाठीचं दूध देताना भावुक
संदिप पाठकने पुढे सांगितले की प्रसिद्धीचा तोटा हा एक टक्का आहे. आता मोबाईल मध्ये कॅमेरा आल्यामुळे तुम्ही कुठेही गेलात तरी तुमचा फोटो काढला जातो. पण आपण सगळ्यांनी त्याचा कुठेतरी भान ठेवायला पाहिजे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन झालं, त्यांचा पार्थिव दर्शनासाठी ठेवलेलं तेव्हा आम्ही तिथे गेलेलो. तिथे एक माणूस आला त्याने त्या डेड बॉडी सोबत शेवटची आठवण म्हणून सेल्फी काढला. ते पाहून मला वाटलं की कुठे चाललोय आपण! माणूस गेला की लोकांना फोटो काढायचा आहे. एक वेळ समजू शकतो की कलाकार आहे दुःखात आहे पण ते सगळे अंत्यसंस्कार झाल्यानंतर फोटो काढला… खरंतर तेही नकोच पण जो माणूस गेला त्याच्यासोबत तुम्हाला फोटो काढायचाय तर हे खूप अति आहे.

एकदा तर मी हॉटेलात जेवत असताना एका चाहत्याने मला ओळखलं, तो माझ्याकडे आला नी म्हणाला सर सेल्फी… मी म्हटलं देतो आणि जेवू लागलो कारण माझ्या हातात घास होता. पण तो परत बोलला जरा लवकर द्या ना सेल्फी मला बाहेर जायचंय. म्हणजे लोक हा सुद्धा विचार करत नाही की बाबा समोरचा माणूस जेवतोय आपणण 5/10 मिनिटं थांबायला हवं. त्यामुळे कुठेतरी हे प्रसिद्धीचे तोटे वाटतात.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा