माझा पाठलाग करतायेत, प्लीज मदत करा; जैन मुनी प्रकरणानंतर प्रसाद वेदपाठकने मागितली राज ठाकरेंकडे मदत – Marathi News | Prasad Vedpathak Seeks Raj Thackerays Help Claims Threat to Life


सोशल मीडिया इन्फ्लूएंसर प्रसाद वेदपाठक सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने सोशल मीडियावर सोसायटीमधील जैन साध्वींसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा उचलला धरला होता. त्यानंतर आता त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली आहे. प्रसादने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली आहे. तसेच त्याने पोस्ट मुंबई पोलिसांना देखील टॅग केली आहे.

काय आहे प्रसादची पोस्ट?

काही दिवसांपूर्वी प्रसाद वेदपाठकने सोशल मीडियावर त्याच्या सोसायटीमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या सोसायटीमधील जैन साध्वींसाठी मारण्यात आलेली पांढरी पट्टी दाखवली होती. ही पट्टी सोसायटीमधील कोणालाही न विचारता मारण्यात आली होती. त्यानंतर याविरोधात कारवाई केल्यानंतर पट्टी हटवण्यात आली. प्रसाद वेदपाठकने उपस्थित केलेला हा मुद्दा सध्या सर्वत्र जोर धरुन आहे.

आता प्रसादने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, कालपासून काही लोक माझा पाठलाग करत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, प्लीज माझी मदत करा असे म्हटले होते. तसेच त्याने या पोस्टच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदत मागितली होती. तसेच त्याने ही पोस्ट मुंबई पोलिसांना देखील टॅग केली होती. आता प्रसाद वेदपाठकच्या मदतीला मनसेचे कार्यकर्त्ये आल्याचे पाहायला मिळाले.

दुसऱ्या पोस्टमध्ये मानले आभार

प्रसाद वेदपाठकने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मनसेचे अविनाश जाधव यांचे आभार मानले आहेत. ‘मनःपूर्वक धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी आणि खंबीर पाठिंब्यासाठी. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्ही आम्हाला प्रेमाने “पंछा” म्हणून हाक मारलीत! @RajThackeray साहेब, तुमच्या पाठिंब्यासाठी आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार. जय शिवराय’ असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर प्रसाद वेदपाठकची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच काहींनी मदतीचा हात पुढे केला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *