पुढील आठवड्यात 4 नवीन फोन्स येणार, Realme ते Motorola मध्ये चुरस


भारतीय मोबाईल बाजारपेठेत पुढील आठवड्यात टेक कंपन्यांचा मोठा धमाका होणार असून 4 नवीन बजेट आणि प्रीमियम स्मार्टफोन लॉंच केले जाणार आहेत. यामध्ये रिअलमीचा बहुप्रतिक्षित ‘Realme 16T 5G’ आणि मोटोरोलाचे ‘Moto G37’ आणि ‘Moto G37 Power’ हे दमदार मॉडेल्स भारतीय ग्राहकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

NHMD Vibe 2 5G । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
पुढील आठवड्यात 4 नवीन बजेट आणि प्रीमियम स्मार्टफोन लॉंच केले जाणार आहेत. लॉंच होणाऱ्या फोन्सच्या यादीत ‘HMD Vibe 2 5G’ चा देखील समावेश असून यामुळे बाजारातील स्पर्धा वाढणार आहे. वेगवान प्रोसेसर, पॉवरफुल बॅटरी लाईफ आणि कडक कॅमेरा फीचर्ससह येणारे हे फोन्स कोणत्या दिवशी लॉंच होणार आणि त्यांची किंमत काय असेल, याकडे सर्व टेक प्रेमींचे लक्ष लागले आहे.

तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर थोडा वेळ थांबा कारण पुढील आठवड्यात तुमच्यासाठी भारतीय बाजारात चार नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहेत. रियलमी, मोटोरोला आणि HMD पुढील आठवड्यात धमाकेदार एन्ट्री करणार आहेत, चला जाणून घेऊया कोणत्या दिवशी कोणता फोन लाँच होणार आहे आणि फोनमध्ये कोणते फीचर्स उपलब्ध असतील.

Realme 16T 5G भारतात लाँचिंगची तारीख

रियलमीचा हा नवीन फोन पुढील आठवड्यात 22 मे रोजी दुपारी 12 वाजता ग्राहकांसाठी लाँच करण्यात येणार आहे. लाँचिंगनंतर तुम्हाला हा फोन कंपनीच्या साइटव्यतिरिक्त फ्लिपकार्टवर देखील आढळेल.

Realme 16T 5G स्पेसिफिकेशन्स

या फोनसाठी फ्लिपकार्टवर एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, जी दर्शविते की हा फोन 8000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. असा दावा करण्यात आला आहे की, फोनची बॅटरी नॉन-स्टॉप पॉवर देण्यासाठी तीन दिवसांपर्यंत सपोर्ट करते आणि फोनची बॅटरी हेल्थ 7 वर्षांपर्यंत राहील. हा फोन 45 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह लाँच केला जाईल. याशिवाय हा फोन रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करतो.

Moto G37 भारतात लाँच होण्याची तारीख

मोटोरोलाचा हा फोन पुढील आठवड्यात 19 मे रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. लाँचिंगनंतर हा फोन कंपनीच्या साइटव्यतिरिक्त फ्लिपकार्टवर विकला जाईल, या फोनसाठी फ्लिपकार्टवर एक मायक्रोसाइट देखील तयार करण्यात आली आहे.

Moto G37 फीचर्स

मायक्रोसाइटकडे पाहता हे माहित आहे की हा फोन मीडियाटेक डायमेंशन 6400 प्रोसेसर, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 आय डिस्प्ले प्रोटेक्शन, व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, 6.7 इंच अल्ट्रा-स्मूथ डिस्प्ले, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 50-मेगापिक्सल क्वाड-पिक्सेल तंत्रज्ञान, 5200mAh बॅटरी, स्टिरिओ स्पीकर आणि तीन रंग पर्यायांमध्ये येईल.

Moto G37 पॉवर लाँचिंगची तारीख भारतात

मोटोरोलाचा आगामी मोबाइल पुढील आठवड्यात 19 मे रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. लाँचिंगनंतर हा फोन कंपनीच्या साइटव्यतिरिक्त फ्लिपकार्टवरही विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.

Moto G37 पॉवर स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये 7000mAh बॅटरी, मीडियाटेक डायमेंसिटी 6400 चिपसेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 आय, 50 मेगापिक्सल क्वाड पिक्सेल तंत्रज्ञान, 6.7 इंच डिस्प्ले, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 30 वॉट फास्ट चार्जिंग, 3 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ, व्हर्च्युअल रॅम यासारखे खास फीचर्स मिळणार आहेत.

HMD Vibe 2 5G ची भारतात लाँचिंगची तारीख

हा आगामी फोन पुढील आठवड्यात 21 मे रोजी भारतीय बाजारात ग्राहकांसाठी लाँच केला जाईल. या हँडसेटसाठी फ्लिपकार्टवर एक वेगळी मायक्रोसाइट देखील तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे फोनमध्ये आढळणारी वैशिष्ट्ये समोर आली आहेत

HMD Vibe 2 5G स्पेसिफिकेशन्स (कन्फर्म)

हा आगामी स्मार्टफोन 6000 एमएएच बॅटरी, 50 मेगापिक्सल एआय कॅमेरा, तीन रंग पर्याय, 18 वॉट फास्ट चार्जिंग, 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, 6.7 इंच एचडी प्लस डिस्प्ले, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येईल.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा