Sanchita Ugale TV Actress Aanchal Khurana: संचिता उगलेनं टोकाचं पाऊल उचललं, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं इंडस्ट्रीचं सत्य सर्वांसमोर आणलं, म्हणाली, ‘कलाकारांना गुलामासारखं…’


Sanchita Ugale TV Actress Mumbai Crime Aanchal Khurana: टेलिव्हिजनवरची (Television News) गाजलेली मालिका, ‘कुमकुम भाग्य’मध्ये (कुमकुम भाग्य) झळकलेली मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं. संचितानं नालासोपारा इथल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. संचिताचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष म्हणजे, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीनं आपल्या घरी साडीच्या साहाय्यानं छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. संचिताच्या सोशल मीडिया पेजेसवर ती कोणत्याही समस्येचा सामना करत असल्याचं दर्शवणारे कोणतेही संकेत आढळले नाहीत. संचितानं असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे ‘एनडीटीव्ही’नं (NDTV) अभिनेत्री आंचल खुराना हिच्याशी संवाद साधला. आंचलनं दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करणारी एक पोस्ट केली होती आणि त्या पोस्टच्या संदर्भातच तिनं भाष्य केलं.

आंचल खुरानानं सांगितली रुपेरी पडद्यामागचं जग (Aanchal Khurana on Sanchita Ugale)

संचिता उगले हिनं स्वतःचं आयु्ष्य संपवलं आणि अख्ख्या इंडस्ट्रीला धक्का बसला. अशातच टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध अभिनेत्री आंचल खुराना हिनं टेलिव्हिजनच्या दुनियेचं सत्य सांगितलं. इंडस्ट्रीचं जग चमचमतं, ग्लॅमरस भासतं, पण त्यामागे एक वेगळंच जग असतं, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. अनेक सेलिब्रिटींनी याबाबत वाच्यताही केली आहे. याचसंदर्भात आंचल खुराना हिनं भाष्य केलंय. 

अभिनेत्री आंचल खुराना म्हणाली की, “हे फारच दुःखद आहे, कारण 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याचंही निधन झालेलं. मी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे आणि मला चांगलंच माहितीय की, हे जग कसंय…”

आंचल खुराना म्हणाली की, “आजकाल कास्टिंगमध्ये खूप पक्षपातीपणा केला जातोय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर अतिप्रमाणात भर दिला जातोय. त्यांच्यातूनच लीड अॅक्टर्स निवडले जातात आणि त्यांना 50 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत मानधन दिलं जातं, ज्यामुळे इतर कलाकारांना खूप वाईट वाटतं. तुम्हाला सांगते, जर त्यांनी 5 हजार रुपये मानधन निश्चित केलं असेल आणि तुम्ही 6 हजार रुपये मागितले, तर ते त्याऐवजी सरळ एखाद्या नव्या कलाकाराला घेतात, मग त्या व्यक्तीला अभिनयाचं कौशल्य अवगत आहे की नाही, याचा ते विचारही करत नाहीत. यामुळे कलाकारांवर खूप ताण येतो…”

“कलाकारांना एखाद्या गुलामासारखी वागणूक…” (Aanchal Khurana On TV Industry)

टेलिव्हिजन क्षेत्रातील वास्तव सांगताना आंचल खुराना म्हणाली की, “ते सोशल मीडियावर आपल्याला मिळणारा प्रतिसाद आणि आपल्या ‘रील्स’ची कामगिरी कशी आहे, हे देखील पाहतात. थोडक्यात सांगायचं तर, सतत चर्चेत राहण्याचा किंवा लोकांच्या नजरेत राहण्याचा दबाव असतो. सुमारे 80 टक्के कलाकार अँझायटीच्या समस्येनं ग्रस्त असतात; मलाही याचा अनुभव येतो, माझं हृदय धडधडू लागतं. करारांच्या बाबतीत बोलायचं तर, त्यातील सर्व अटी निर्मात्याच्या फायद्याच्या असतात; कलाकारांच्या हिताचा पूर्णपणे विचार केला जात नाही. ते कलाकारांशी एखाद्या गुलामासारखी वागणूक देतात. मी अशी व्यक्ती आहे, जी आपली मतं ठामपणे मांडते आणि स्पष्टपणे बोलते, त्यामुळे मला कामावर घेताना ते कचरतात. मी वेळेचं पालन करणारी आणि कामाप्रती समर्पित असूनही, केवळ माझ्या या स्पष्टवक्तेपणामुळेच असं घडतं…”

आंचल खुराना आहे तरी कोण? (Who Is Aanchal Khurana?)

आंचल खुराना एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. ती MTV रोडीजच्या आठव्या सीझनची विनर आहे. याव्यतिरिक्त ती ‘सपने सुहाने लड़कपन के’, ‘सरोजिनी:एक नई पहल’, ‘मेरी सासू मां’, ‘जिंदगी की महक’, ‘संतोषी मां’, ‘तू सूरज मैं सांझ पियाजी’, ‘बड़े अच्छे लगते हैं 2’ आणि सध्या ‘तू जूलियट जट्ट दी में’मध्ये दिसतेय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

‘स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही…’; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले…

ABP Majha च्या बातम्या LIVE



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *