Suchitra Bandekar On Puja Birari: आदेश आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) मराठी मनोरंजनसृष्टीतील अत्यंत लाडकं जोडपं. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांची कायम चर्चा रंगलेली असते. आदेश बांदेकर सध्या ‘होम मिनिस्टर’ त्यांच्या कार्यक्रमामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. दुसरीकडे सुचित्रा बांदेकर यांच्या अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीचीही चर्चा रंगली आहे. या मुलाखतीत सुचित्रा यांनी सोहम आणि पूजाबद्दल झालेल्या पहिल्या संवादाविषयी एक खुलासा केलाय. सोहम पूजाला भेटून घरी आला त्यावेळी आदेश परदेशात होता आणि मी घरी आरामात टीव्ही पाहत होते. त्यावेळी सोहमने पूजाविषयी पहिल्यांदा सांगितल्याचं सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलं.
आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याचं आणि अभिनेत्री पूजा बिरारीचं 2025 मध्ये लोणावळ्यात धडाक्यात लग्न झालं. नंतर मुंबईत दोघांचं शाही रिसेप्शनही करण्यात आलं होतं.त्यांच्या लग्न सोहळ्याची संपूर्ण मनोरंजनसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये एकच चर्चा होती. सोनचाफा प्रोडक्शनला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी पूजा आणि सोहमच्या भेटीचा किस्सा सांगितला. सोहमने त्यावेळी पूजा बद्दल पहिल्यांदा काय सांगितलं होतं? यावर सुचित्रा बांदेकरांची काय प्रतिक्रिया होती याबद्दलही त्या बोलल्यात.
काय म्हणाल्या सुचित्रा बांदेकर ?
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या ‘ ही पूजाला आधीच पाहिलं होतं.मला ती ऑन स्क्रीन खूप आवडायची पण मी तिला कधी भेटले वगैरे नव्हते.प्रत्यक्ष असं काहीच संबंध नव्हता .तिने आमचा ऑलमोस्ट सुफळ संपन्न’ या मालिकेत काम केलं होतं.पण तेव्हाही आमची काही भेट झाली नव्हती. सोहम आणि तिची पहिली भेट होती.तिच्याबरोबर तो कुठेतरी गेला होता. ते दोघेही पाणीपुरी खायला गेले होते. कारण, तिला पाणीपुरी खायची होती. पूजाला भेटून तर घरी आला.तेव्हा मी घरी एकटी होते आणि आदेश परदेशात होतं. मी घरी अगदी आरामात टीव्ही पाहत होते. त्याने आल्यावर मला सांगितलं. ‘आई मी घरी आलोय.यात पाणीपुरी खाऊन आलोय त्यामुळे मला भूक नाहीये.’मग मी म्हटलं, ‘ओके हरकत नाही. तो नंतर त्याच्या रूममध्ये गेला . त्याला वाटलं अरे, आज आईने कोणाबरोबर गेलास वगैरे काहीच विचारलं नाही. अशी तर खूप चौकशी करत असते. म्हणून कदाचित त्याला नवल वाटलं असावं.मग तो परत आला आणि म्हणाला ‘आई तुला माहितीये का मी पाणीपुरी खायला कोणाबरोबर गेलो होतो..तर म्हणाला पूजा.’
सुचित्रा पुढे म्हणाल्या ‘ माझं असं झालं कोण पूजा?मग तो म्हणाला पूजा बिरारी!मी शॉकच झाले. म्हटलं ‘ती कुठे भेटली तुला ? त्याने मला सांगितलं की आम्ही थोडे दिवस बोलत होतो एकमेकांशी.आणि तिला पाणीपुरी खायची होती.मग मीच त्याला बोलले ‘अरे सोहम चांगलीय ती मुलगी बघ जरा’ त्याचा असं झालं की ‘आई प्लीज यार आज आम्ही पहिल्यांदाच भेटलोय ‘. मी त्याला नीट समजावलं, की तुला खरच पूजा आवडली असेल, तर तिला विचार.काही दिवसांनी सोहमणे तिला प्रपोज केलं.मग ती मला भेटायला आली होती.इतकी गोड मुलगी आहे.तिच्यात एक खरेपणा आहे.सोहम खूप लकी आहे म्हणूनच त्याला अशी छान जोडीदार मिळाली ‘ असं सुचित्रा म्हणाल्या.
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव