Samantha Ruth Prabhu Confirms Pregnancy: गूड न्यूज! ‘नॅशनल क्रश’ 39व्या वर्षी होणार आई, स्वतःच कंफर्म केली प्रेग्नेन्सी, इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन मॅटरनिटी लीव्हवर जाणार अभिनेत्री


Samantha Ruth Prabhu Confirms Pregnancy: साऊथ सिनेसृष्टीतील (South Film Industry) सुपरस्टार समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिनं अखेर आपली प्रेग्नेन्सी अनाउंस केलीय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर समंथा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. पण, आता स्वतः अभिनेत्रीनंच या वृत्ताला दुजोरा दिलाय. समंथा लवकरच आई होणार असून, ती आता ‘मॅटर्निटी ब्रेक’ घेणार असल्याचं तिनं सांगितलं आहे. 

‘मा इंटि बंगारम’ (Maa Inti Bangaram) सिनेमाच्या सक्सेस मीटवेळी मीडियाशी बोलताना समंथा म्हणाली की, “माझ्या सध्याच्या परिस्थितीमुळे ‘मा इंटि बंगारम’नंतर मला थोडा ब्रेक घ्यावा लागेल. मला मॅटर्निटी रजेवर जावं लागणार आहे. त्यानंतर, मी एका नव्या सिनेमासह माझ्या चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येईन…”

समंथाच्या या वक्तव्यानंतर तिच्या गरोदरपणाबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. तसेच, ती खरंच गरोदर असल्याचं कळताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. दरम्यान, सिनेमाच्या  पार्टीतील काही व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तिचा ‘बेबी बंप’ दिसत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर अफवांना उधाण आलेलं.

मां बनने वाली हैं समांथा (Credit: Instagram/@samantharuthprabhu)

समंथाचं स्वप्न पूर्ण झालं… (Samantha Confirms Pregnancy)

मीडिया रिपोर्टनुसार, समंथा सध्या गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, विशेषतः पहिल्या तिमाहीत आहे. ती आणि तिचा पती राज निदिमोरू (Raj Nidimoru) त्याच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या चिमुकल्या पाहुण्याच्या चाहुलीनं अगदीच आनंदी आहेत. समंथाला नेहमीच आई व्हायचं होतं, त्यामुळे हा तिच्यासाठी अत्यंत खास क्षण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डिसेंबर 2026 मध्ये तिची प्रसूती होण्याची शक्यता आहे.

सिनेमाच्या दिग्दर्शिका नंदिनी रेड्डी (Nandini Reddy) यांनीही समंथाच्या गरोदरपणाबद्दल आनंद व्यक्त केलाय. त्यांनी नमूद केलंय की, ही गूड न्यूज समंथाच्या आयुष्यात अशा वेळी आलीय, जेव्हा तिचा ‘मा इन्टी बंगारम’ (Maa Inti Bangaram) सिनेमा प्रचंड यश मिळवतोय. विशेष म्हणजे, सक्सेस मीटमध्ये समंथानं ‘बेबी बंप’ लपवण्याऐवजी फ्लॉन्ट केला. 

गेल्या वर्षीच समंथानं राज निदिमोरूसोबत बांधलेली लग्नगाठ (Samantha Raj Nidimoru Confirm Pregnancy)

समंथाने डिसेंबर 2025 मध्ये कोईम्बतूर इथल्या ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात एका अत्यंत खाजगी समारंभात सिनेनिर्माते राज निदिमोरू यांच्याशी विवाह केलेला. ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) या वेब सीरिजच्या निर्मितीदरम्यान त्यांची भेट झालेली, ज्यामध्ये समंथानं ‘राझी’ ही अविस्मरणीय भूमिका साकारलेली. 

समंथाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मा इन्टी बंगारम’ सिनेमाबाबत बोलायचं झालं तर, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करतोय. प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमानं जगभरात 50 कोटी रुपयांहून अधिक कमाई केलीय. अशा प्रकारे, ब्लॉकबस्टर सिनेमा आणि वैयक्तिक आयुष्यातील मोठा आनंद यामुळे 2026 हे वर्ष समंथासाठी खरोखरंच खास ठरलं आहे. आता चाहते तिच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान, प्रसूतीनंतरच्या विश्रांतीनंतर आपण सिनेमांमध्ये जोरदार पुनरागमन करू, हे देखील अभिनेत्रीनं स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Dawood Ibrahim Madly In Love With Anita Ayoob: ना मंदिकिनी, ना जॅस्मीन… ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम? हिरोईनसाठी प्रोड्युसरलाही संपवलेलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *