Gayatri Mantra: ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्॥ हा मंत्र आपण अनेक वर्षांपासून ऐकत किंवा बोलत आलो आहोत. आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडून हा मंत्र ऐकायला मिळतोच, हिंदू धर्मानुसार पाहायला गेलं तर हा मंत्र एक पवित्र मंत्र आहे, पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की या मंत्राचा खरा अर्थ काय आहे?
गायत्री मंत्राचा खरा अर्थ काय आहे? (Gayatri Mantra)
धार्मिक मान्यतेनुसार, गायत्री मंत्राला महामंत्र आणि वेदांचे सार म्हटले गेले आहे. पालक आपल्या मुलांना लहानपणापासूनच हा शक्तिशाली मंत्र पाठ करायला लावतात. असे म्हटले जाते की या मंत्राचा जप केल्याने शक्ती, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढते, तसेच मानसिक ताण कमी होतो. इतकेच नाही, तर हा मंत्र स्मरणशक्ती देखील वाढवतो. या मंत्रात 24 अक्षरे आहेत, जी चोवीस शक्ती आणि सिद्धींची प्रतीके मानली जातात. या मंत्राचा अर्थ जाणून घेऊया.
गायत्री मंत्राचा अर्थ
ॐ भूर्भुवः स्वःतत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्॥
मंत्राचा अर्थ: आपण आपल्या अंतरात्म्यात दुःखाचा नाश करणाऱ्या, सुखाचे मूर्तिमंत रूप असलेल्या, सर्वोच्च, तेजस्वी, पापांचा नाश करणाऱ्या, साक्षात ईश्वराला ग्रहण करावे. तो ईश्वर आपल्या बुद्धीला चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देवो.
गायत्री मंत्राचा शब्दशः अर्थ
ॐ – संपूर्ण विश्वात निनादणारा दिव्य
भू – प्राणदाता
भुवः – दुःखांचा नाश करणारा
स्वः – सुख देणारा
तत् – त्या देवाला
सवितु – तेजस्वी
वरेण्यं – श्रेष्ठ, पूजनीय
भर्गो – पापांचा नाश करणारा
देवस्य – दिव्य
धीमहि – आपण ध्यान करूया
धियो – बुद्धीला.
यो – जो (परमात्मा)
नः – आमचा
प्रचोदयात् – चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दे
गायत्री मंत्राच्या जपाचे फायदे
- धार्मिक मान्यतेनुसार, गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने सभोवतालच्या वातावरणात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
- गायत्री मंत्राच्या नियमित जपाने व्यक्तीची तेजस्विता वाढते आणि मानसिक समस्या दूर होतात.
- हा मंत्र स्मरणशक्ती सुधारतो.
- ऋषीमुनींनी या मंत्राचे वर्णन सर्व इच्छा पूर्ण करणारा असे केले आहे.
- असे म्हटले जाते की, जेव्हा आपण गायत्री मंत्राचा जप करतो, तेव्हा आपल्या 24 ग्रंथी सक्रिय होतात.
मंत्राचा जप करण्याची योग्य पद्धत
- धार्मिक मान्येतनुसार, तुम्ही गायत्री मंत्राचा जप कधीही आणि कुठेही मनातल्या मनात करू शकता,
- तरी त्याचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी सकाळी त्याचा जप करावा.
- यासाठी, तुम्ही सूर्योदयाच्या थोड्या वेळापूर्वी जप सुरू करावा आणि सूर्योदय होईपर्यंत जप चालू ठेवावा.
- गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी संध्याकाळची वेळ देखील सर्वोत्तम मानली जाते.
हेही वाचा
Weekly Horoscope: जूनचा शेवट, जुलैची सुरूवात, पुढची आठवडा पॉवरफुल! वटपौर्णिमेसह संकष्टी चतुर्थीचा शुभ संयोग, 12 पैकी 7 राशी मालामाल, साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!