Nirjala Ekadashi 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 25 जून 2026 रोजी म्हणजेच आज सर्वात मोठी एकादशी म्हणजेच निर्जला एकादशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी केलेला उपवास आणि पूजा ही वर्षातील सर्व 24 एकादशींच्या समान मानली जाते. यंदाची एकादशी मात्र खास आहे. कारण आजच्या दिवशी दोन शुभ राजयोग निर्माण झाले आहेत.
खरंतर, आजची निर्जला एकादशी नवपंचम राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोगात साजरी करण्यात येणार आहे. जेव्हा दोन ग्रह जवळपास 120 डिग्री अंशावर स्थित असतात तेव्हा नवपंचम राजयोग जुळून येतो. निर्जला एकादशीच्या दिवशी हा योग शुक्र आणि शनि बनवणार आहेत. तर, बुध आणि शुक्र ग्रह कर्क राशीत युती करुन लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण करणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांवर दोन शुभ योगांचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. या कालावधीत नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सपोर्ट मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना या काळात नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तसेच, व्यवसायाशी संबंधित तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनिचा प्रभाव असणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील हा शुभ संयोग मानला जातो. या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. तसेच,जर तुम्हाला घर, वाहन किंवा एकादी नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Horoscope Today 25 June 2025 : आज गुरुवारचा दिवस, निर्जला एकादशीच्या दिवशी ‘या’ 5 राशींना मिळणार पुण्य फळ; वाचा आजचे राशीभविष्य
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!