Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली…


Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील (Pune) बहुचर्चित केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder Case) हत्या प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट आला आणि अख्खा देश हादरला. सुरुवातीला अपघात वाटणारं हे प्रकरण खरंतर एक मर्डर मिस्ट्री (Ketan Agrawal Murder Mystery) होतं. होणाऱ्या बायकोच्या प्रेमप्रकरणामुळे केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या उच्चशिक्षित तरुणाचा नाहक बळी गेला. सुरुवातीला पुण्यातील लोहगडावरून (Lohagad) घसरुन केतन अग्रवालचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं, पण नंतर त्याची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यानं केतनला दरीत ढकललं. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. एखाद्या सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल अशा या प्रकरणावर आता अभिनेत्री हिना खान (Actress Hina Khan) हिनं भाष्य केलंय. हिना खाननं संतप्त प्रतिक्रिया देत, केतनला खोल दरीत ढकलणाऱ्या सिया गोयलला प्रश्न विचारला आहे. 

हिना खान नेमकं काय म्हणाली? (Hina Khan On Pune Ketan Agrawal Case)

अभिनेत्री हिना खान (TV Actress Hina Khan) हिनं पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा निषेध करत आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय की, “आजच्या काळात खरं ऐकणं आणि खरं बोलणं इतकं कठीण झालंय की, लोक कोणाचा जीव घ्यायलाही तयार होतात… सत्य स्वीकारण्यापेक्षा एखाद्याचा जीव घेणं त्यांना जास्त सोपंय, असं वाटतं… तू फक्त खरं बोलून त्याला सोडू शकत होतीस आणि तुला हवं तसं तुझं आयुष्य कोणासोबतही जगू शकत होतीस… मग असं का केलंस? अत्यंत वेदनादायी…”

Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरण नेमकं काय? (Pune Ketan Agrawal Murder Case)

पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झालाय. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनंच आपल्या प्रियकराच्या मदतीनं रचलेला हा एक थंड डोक्यानं केलेला ‘मर्डर प्लॅन’ असल्याचं निष्पन्न झालंय. अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालंय. सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेलेला. यावेळी फोटोसाठी पोज देताना सियाच्या बॉयफ्रेंडनं केतनला दरीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. केतनची हत्या एक अपघात असल्याचा प्लॅन होता, असं सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडला दाखवायचं होतं. पण एका सीसीटिव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्यानं प्रकरणाचा छडा लागला आणि दोघांनीच मिळून केतनची हत्या केल्याचं उजेडात आलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Samantha Ruth Prabhu Confirms Pregnancy: गूड न्यूज! ‘नॅशनल क्रश’ 39व्या वर्षी होणार आई, स्वतःच कंफर्म केली प्रेग्नेन्सी, इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन मॅटरनिटी लीव्हवर जाणार अभिनेत्री 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *