Salman Khan: बॉलिवूड हादरलं! पापाराझींसोबत वाद होताच सलमान खानने उचललं मोठं पाऊल? थेट… – Marathi News | Salman khans instagram account suddenly disappears after paparazzi controversy fans worried


बॉलिवूडचा भाईजान म्हणून अभिनेता सलमान खान ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांसोबतच तो खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सध्या एका वेगळ्या कारणामुळे सलमान खान चर्चेत आहे. सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी’ (Matrubhoomi) यासोबतच पपाराझी वाद आणि त्याच्या अलीकडच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे चर्चेत आहे. नुकतेच, पपाराझींवर संतापल्यानंतर अभिनेत्याने काही क्रिप्टिक (गूढ) पोस्ट केल्या होत्या, परंतु आता त्याचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाले आहे, ज्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

खरंतर, जेव्हा लोकांनी सलमान खानची प्रोफाइल (Salman Khan Insta Profile) सर्च केली, तेव्हा त्यांना अकाउंट दिसले नाही आणि ‘क्षमा करा, हे पेज उपलब्ध नाही’ अशी नोंद लिहिलेली दिसली. ही नोंद पाहिल्यानंतर चाहते काळजीत पडले आणि विचार करू लागले की, भाईजानचे अकाउंट हॅक झाले किंवा डिलीट तर झाले नाही ना, की त्याने स्वतःच काही काळासाठी ते डीॲक्टिव्हेट केले आहे.

व्हायरल झाले सलमान खानच्या इंस्टा अकाउंटचे स्क्रीनशॉट्स

सलमान खानचे अकाउंट गायब झाल्यानंतर इंटरनेटवर याचे स्क्रीनशॉट्स आणि लोकांच्या प्रतिक्रिया वेगाने व्हायरल होऊ लागल्या. चाहते बरेच चिंतेत आणि गोंधळलेले दिसले. अनेक युजर्सनी ‘एक्स’वर याबद्दल चर्चा केली आणि सलमान खानचे अकाउंट हॅक झाले नसावे, अशी आशा व्यक्त केली. मात्र, गायब झाल्यानंतर सुमारे ३० मिनिटांनी त्याचे अकाउंट परत आल्यावर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

या प्रकरणावर अभिनेता काय म्हणाला?

दरम्यान, अद्याप या प्रकरणावर सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. त्यामुळे अकाउंट कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे गायब झाले होते, सलमानने स्वतः ते बंद केले होते, की कोणीतरी ते हॅक करण्याचा प्रयत्न केला होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विशेष म्हणजे, इंस्टाग्रामवर सलमान खानचे ७२ दशलक्षाहून (72 Million) अधिक फॉलोअर्स आहेत. तो नेहमी या प्लॅटफॉर्मवर आपले चित्रपट, फिटनेस रुटीन आणि कुटुंबासोबतच्या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *