Rohit Sharma Marathi News : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा पराभव झालाच पण त्यांना शेवट काही गोड करता आला नाही. मात्र शेवटच्या सामन्यात १ मिनिटेही मैदानावर आला नाही पण नकोसा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबई इंडियन्स संघाला प्रोत्साहित करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर रविवारी २० हजारांहून अधिक शाळकरी मुले-मुली उपस्थित होती. मात्र, त्यांना विजयाची भेट देण्यात मुंबई इंडियन्सचा संघ अपयशी ठरला. ‘मुंबई’ला आयपीएल टी-२० क्रिकेटमधील अखेरच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून ३० धावांनी हार पत्करावी लागली. या विजयामुळे ‘राजस्थान’चा ‘प्ले-ऑफ’ अर्थात अव्वल चार संघांतील प्रवेश निश्चित झाला. ‘राजस्थान ‘च्या विजयामुळे ‘कोलकाता’, ‘पंजाब’चे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या नावावर अशा विक्रमाची नोंद झाली ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २०५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरने रोहित शर्माला शून्यावरच माघारी पाठवले. रोहित आयपीएलमध्ये १९व्यांदा शून्यावर बाद झाला. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलशी त्याने बरोबरी साधली. यामध्ये रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल १९ वेळा, दिनेश कार्तिक १८, सुनील नारायण १८ आणि पियुष चावला १६ वेळा शून्यावर आऊट झाला आहे. MI vs RR : मुंबईने शेवटची मॅचही गमावली, कॅप्टन हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं परभवाचं खापर? राजस्थानचा एक बॉलर पलटणला पुरून उरला तिसऱ्या षटकात आर्चरने नमन धीरचा त्रिफळा उडवला. पुढच्या षटकात नांद्रे बर्गरने रायन रिक्लेटनचा अडथळा दूर केला. सहाव्या षटकात ब्रिजेश शर्माने तिलक वर्माचा त्रिफळा उडवला. या वेळी ‘मुंबई’ची ५.१ षटकांत ४ बाद ३८ अशी स्थिती झाली होती. ‘राजस्थान’ने निम्मी लढाई जिंकली होती. मात्र, सूर्यकुमार यादव मैदानात असेपर्यंत ‘मुंबई’ला विजयाची आशा होती. सूर्यकुमारने विल जॅक्ससह पाचव्या विकेटसाठी ३९ चेंडूंत ६३, तर हार्दिक पंड्यासह २५ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी रचली. पंड्याने १५ चेंडूंतच ३५ धावांचा चोप दिल्याने ‘मुंबई’च्या चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेतले होते. मात्र, आर्चरने पंड्याला बाद करून ‘राजस्थान’ला विजयाच्या मार्गावर नेले, तर बर्गरने सूर्यकुमारला माघारी पाठवून ‘राजस्थान’चा विजय निश्चित केला. आर्चरने अवघ्या १७ धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. ‘मुंबई’ला यंदाच्या मोसमात ‘वानखेडे’वरील सात पैकी पाच लढतींत पराभव पत्करावा लागला. Sara Tendulkar : लाखात एक नणंद! साराच्या पोस्टमध्ये युजरने सानिया वहिनीला वगळल्याने तिचा एकच शब्दात कडक रिप्लाय, लाईक्सचा पडला पाऊस तत्पूर्वी, ‘मुंबई’ने नाणेफेक जिंकून ‘राजस्थान’ला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. सर्वांना उत्सुकता वैभव सूर्यवंशीची होती. मात्र, यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि रियान पराग पॉवरप्लेमध्येच माघारी परतले. ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, दसुन शनाका, डोनोव्हॅन फेरेरा, जोफ्रा आर्चर, रवींद्र जाडेजा यांनी छोट्या-छोट्या खेळी करून ‘राजस्थान’ला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. यात आर्चरच्या ३२ धावा महत्त्वपूर्ण ठरल्या.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा