RCB vs GT Final Live Streaming: कुठे आणि कसा पाहता येणार अंतिम सामना, जाणून घ्या सर्वकाही – Marathi News | Ipl 2026 RCB vs GT Final Live Streaming Where and how to watch the final match know everything


RCB vs GT Final Live Streaming: कुठे आणि कसा पाहता येणार अंतिम सामना, जाणून घ्या सर्वकाहीImage Credit source: IPL/BCCI

आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्याने होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जेतेपदासाठी दोन्ही संघ भिडणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ पहिल्यांदा भिडणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम फेरीचा सामना होणार आहे. खरं तर सुरूवातीला अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार होता. पण बीसीसीआयने एका वादानंतर ठिकाण बदललं आणि नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालण्याची संधी दोन्ही संघांना आहे. आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण नऊ सामने झाले आहेत. यापैकी आरसीबीने पाच सामने जिंकले आहेत, तर गुजरातने चार जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता वाढली आहे. तुम्हालाही या सामन्याची उत्सुकता असेल आणि कुठे पाहता येईल सामना याची शोधाशोध सुरू असेल तर त्याची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील.

आरसीबी आणि गुजरात सामना कधी खेळला जाईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम फेरीचा सामना 31 मे रोजी रविवारी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी एक दिवस राखीव आहे. काही कारणास्तव हा सामना झाला नाही तर 1 जून रोजी खेळवला जाईल. गुजरात टायटन्स संघ अंतिम सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे, त्यामुळे संघासाठी फायदेशीर ठरू शकते.

आरसीबी आणि गुजरात सामना कुठे खेळला जाईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार 31 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल आणि 7.30 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल.

आरसीबी आणि गुजरात सामना कुठे पाहता येईल?

आयपीएल 2026 स्पर्धेचे प्रसारणाचे हक्क हे स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. त्यामुळे टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग जियोहॉटस्टार एपवर असेल. इतकंच काय टीव्ही 9 मराठीवर लाईव्ह अपडेट तुम्हाला मिळतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *