Ravi Pradosh Vrat 2026 : जुलै महिन्यात पहिलं प्रदोष व्रत नेमकं कधी? वाचा शिव पूजनाचा शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी


Ravi Pradosh Vrat 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केलं जातं. हा उपवास भगवान शंकराला समर्पित करण्यात आला आहे. ज्या दिवशी प्रदोष व्रत असतं त्या दिवसाच्या नावाने प्रदोष व्रताला ओळखलं जातं. भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा सर्वात योग्य काळ मानला जातो. या व्रतात भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. 

धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी खऱ्या भावनेने आणि विधीवत पूजा केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात. तसेच, सर्व अडचणींवर मात करता येते. प्रदोष व्रतामुळे आपल्या जीवनात सुख-शांती नांदते. त्यानुसार, यंदा प्रदोष व्रत नेमका कधी आणि त्याच शुभ मुहूर्त काय असणार आहे हे जाणून घेऊयात. 

रवि प्रदोष व्रत तिथी (Ravi Pradosh Vrat Tithi 2026)

द्रिक पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथी 12 जुलै 2026 रोजी रविवारी सकाळी 2 वाजून 04 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, रात्री 10 वाजून 29 मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे. एकूणच प्रदोष काळ 12 जुलैला संपणार आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी रविवार असल्या कारणाने या रवि प्रदोष व्रत म्हणतात. 

रवि प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त (Ravi Pradosh Vrat Shubh Muhurt 2026)

द्रिक पंचांगानुसार, 12 जुलै 2026 रोजी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी प्रदोष काळ संध्याकाळी 7 वाजून 36 मिनिटांपासून सुरु होऊन ते रात्री 9 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे. 

रवि प्रदोष व्रत पूजा विधी 

  • रवि प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. तसेच, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. 
  • त्यानंतर संकल्प करा आणि संपूर्ण दिवस सात्विक आहार घ्या. 
  • प्रदोष काळात भगवान शंकराच्या शिवलिंगावर गंगाजल, दूध, दही, मध, तूप आणि सारखेचा अभिषेक करा. 
  • त्यानंतर बेलपत्र, पांढऱ्या रंगाचं फूल तसेच फळं अर्पण करा. 
  • पूजेच्या दरम्यान ओम नम:शिवाय मंत्राचा जप करा. तसेच, प्रदोष व्रताचा कथा पाठ करा. 
  • शिव चालीसा तसेच, शिव स्तुतीचे पठण करा. 
  • अखेर भगवान शंकर आणि देवी पार्वतीची आरती करा. तसेच, आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Shukra Gochar 2026 : शुक्र-केतूच्या संयोगाने 4 राशींचं नशीब पालटणार; 4 जुलैपासून धनसंपत्तीत होणार भरभराट, श्रीमंतीत जगतील राशी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *