Mumbai Manhole Video Marathi News: मुंबईतील साकीनाकाजवळ मॅनहोलमध्ये माणूस कसा पडला?; अंगावर काटा आणणारा VIDEO


Mumbai Manhole Video Marathi News: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र पाऊस सुरु आहे. याचदरम्यान, आज एक धक्कादायक घटना समोर आली. मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर अस्लम शेख नावाचा व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये (Man Fell Into Manhole Mumbai) पडला. या व्यक्तीला सदर रस्त्यावरील पुढील मॅनहोलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होता. साधारण 3 तासांनंतर मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले. परंतु सदर व्यक्तीचा मृत्यू झाला होता. (Mumbai Manhole Marathi News)

सदर घटनेचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मॅनहोलचं झाकण उघडं असून बाजूला काम करणारा कर्मचारी उभा असल्याचं दिसून येत आहे. अस्लम शेख समोरुन चालत आले, त्यावेळी थेट मॅनहोलमध्ये पडले. सदर व्यक्ती मॅनहोलमध्ये पडताच बाजूला उभा असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या ते लक्षात आले. सदर कर्मचारी त्यानंतर मॅनहोलमध्ये वाकून बघत असल्याचं दिसून येतंय. (Mumbai Manhole Video Marathi News)

नेमकं काय घडलं? (Mumbai Manhole News)

साकीनाका येथील खैरानी रोड भागात मॅनहोल दुरुस्तीचे काम सुरु होते. या कामामुळे मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. यावेळी फोनवर बोलणारा अस्लम नावाचा व्यक्ती मॅनहोलमध्ये 20 ते 25 फूट खाली पडला. सदर व्यक्ती मॅनहोलमध्ये पडल्याचे बाजूला काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला समजले. यानंतर त्याने महानगरपालिका आणि रेस्क्यू टीमला कळवले. सदर घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. या व्यक्तीला सदर रस्त्यावरील पुढील मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. जेव्हा बाहेर काढले, तेव्हा सदर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत होता. थोड्यावेळाने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. (Andheri Manhole Incident)

कामगारांच्या निष्काळजीपणामुळे सदर व्यक्तीचा जीव- (Andheri Manhole Marathi News)

संबंधित मॅनहोलची खोली सुमारे 20 ते 25 फूट असून, खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. इथं बॅरिकेटही करण्यात आलं नव्हतं. इथ काम करणाऱ्या कामगारांच्या निष्काळजीपणामुळे सदर व्यक्तीचा जीव गेला. सध्या मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचलं होतं. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली. यानंतर साधारण 2 वाजता या व्यक्तीला दुसऱ्या मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे मदतकार्याला उशीर झाल्याचं देखील दिसून येतंय. 

मॅनहोलचं उघड्यावरती काम सुरु होतं- (Mumbai Manhole Marathi News)

साधारणत 10:30 वाजताच्या सुमारास ही व्यक्ती या ठिकाणी पडलेली होती, आणि ती थेट साधारण 15 ते 20 फूट अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोलमध्ये वाहून आलेली होती. सध्या घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी आणि सर्वच पक्षीय या ठिकाणचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते आणि या माणसाला रेस्क्यू करण्याचं काम सुरू होतं. साधारणत 20 ते 25 फूट खोल हे मॅनहोल आहे, काही कामानिमित्त हे मॅनहोल खुलं करण्यात आलेलं होतं, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस असतील आणि सगळ्या त्यांचे काही नातेवाईक आहेत, अस्लम शेख असं या व्यक्तीचं नाव आहे, त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. पाऊस वाढला होता तर परत घरी जात होते, लोकं काही काम करत होते, पण त्यांना काय लोकांच्या जीवाशी काही घेणं देणं नाही, काय लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी काही ठेवलं नव्हतं बॅरिकेट काही नव्हते. उघड्यावरती काम चालू होतं, त्याच्यामध्ये माझा भाऊ पडला आहे अशी माहिती मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीच्या भावाने दिली आहे.

संबंधित बातमी:

Mumbai Sakinaka Manhole : मुंबईच्या साकीनाक्याजवळ मॅनहोलमध्ये माणूस नेमका कसा पडला?; चक्रावणारी माहिती समोर, व्यक्तीचा मृत्यू





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *