मराठी बालभारतीच्या 6 वीतील ‘लोकनृत्य’ धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश


नागपूर : राज्यात यंदाच्या वर्षापासून एकीकडे सीबीएससी पॅटर्ननुसार शालेय शिक्षणपद्धती (School) अवलंबली जात असून मराठी हा विषय सक्तीचा आहे. मात्र, दुसरीकडे मराठी आणि महाराष्ट्र विषयावरुन नेहमीच शिक्षण (Education) विभागातील काही ना काही त्रुटी समोर येतात. आता, बालभारतीच्या (Balbharati) इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘लोकनृत्य’ धड्यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कारण, या धड्यात एकूण पाच लोकनृत्यांचा समावेश आहे. त्यापैकी, केवळ एक लोकनृत्यू महाराष्ट्रातील असून इतर चार परराज्यांतील आहेत. त्यामुळे, आता या धड्याला विरोध होत असून शासन दखल घेणार का, हे पाहावे लागेल. 

महाराष्ट्रातील लावणी, लेझीम, धनगरी गजा, गोंधळ, कोळी नृत्य, पोवाडा यांसारख्या समृद्ध लोकपरंपरेला पुरेसे स्थान न दिल्याने जेष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशींसह शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि सांस्कृतिक जाणकारांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थी सहाव्या इयत्तेत शिकत असता राज्यातील विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची अधिक व्यापक ओळख करून देणे आवश्यक होते. प्रत्येक विभागानुसार लोकनृत्याचा समावेश करता आला असता. मात्र, तसे झाले नसल्याने रिजॉइंडर जोडून पाठ्यपुस्तकात सुधारणा करावी अशी मागणी जेष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

या धड्याला घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व भालभारती यांना देखील याचा खुलासा केला नसल्याने, त्यावर देखील त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. यापूर्वीही इयत्ता तिसरीच्या पुस्तकात भिडेवाड्याचा उल्लेख “महाराष्ट्रातील पहिली शाळा” असा करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. इतिहासानुसार भिडेवाडा ही देशातील पहिली मुलींची शाळा असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बालभारतीने संबंधित मजकुरात दुरुस्ती करण्याची घोषणा केली होती. आता, लोकनृत्याच्या धड्यामुळे पुन्हा एकदा बालभारतीच्या अभ्यासक्रमाला घेऊन राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश

दरम्यान, बालभारतीच्या पुस्तकात 5 लोकनृत्यांचा उल्लेख दिसून येतो. मात्र, प्रत्यक्ष वारकरी दिंडी हे एकमेव लोकनृत्य घेण्यात आले आहे. तर, उर्वरीत 4 लोकनृत्ये ही वेगवेगळ्या राज्यातील आहेत. त्यामध्ये, पंजाबजे भांगडा, गुजरातमधील रास-नृत्यू, बिहारमधील आदिवासी नृत्य आणि छत्तीसगडमधील बस्तर या लोकनृत्यांचा समावेस आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील मराठी लोकनृत्यांचा समावेश न करता इतर राज्यांच्या लोकनृत्याचा समावेश केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

हेही वाचा

धक्कादायक! मुंबईत ‘मॅनहोल’ध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; रेस्कू ऑपरेशन सुरू, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *