Prasad Vedpathak Meet Sandip Deshpande: पांढऱ्या पट्टीला विरोध करताच अख्ख्या सोसायटीने वाळीत टाकलं, जीवे मारण्याच्या धमक्या, प्रसाद वेदपाठकला मनसेचं संरक्षण, संदीप देशपांडे म्हणाले…


Prasad Vedpathak Meet Sandip Deshpande: काही दिवसांपूर्वी घाटकोपरच्या (Ghatkoper News) एका सोसायटीमधून सुरू झालेला वाद थेट अख्ख्या मुंबईभर (Mumbai News) चिघळला. इन्फ्लुएन्सर, युट्यूबर प्रसाद वेदपाठक (Influencer, YouTuber Prasad Vedpathak) यानं त्याच्या सोसायटीत मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा मुद्दा लावून धरला आणि मोठा गदारोळ झाला. त्यानंतर एका प्रायव्हेट सोसायटीच्या आवारात मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा (White Line Controvercy) हा मुद्दा थेट राजकारणाच्या आखाड्यात पोहोचला. त्यानंतर या वादात मनसेनं उडी घेतली आणि प्रसाद वेदपाठकला (Prasad Vedpathak) पाठींबा दिला. प्रसाद वेदपाठकनं त्याला येत असलेल्या धमक्यांविरोधात राज ठाकरेंकडे (Raj Thackeray) मदत मागितलेले. त्यानंतर अलिकडेच त्यानं मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रसाद वेदपाठक मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) आणि अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांची भेट घेणार आहे. त्यामुळे आता पांढऱ्या पट्ट्यांचा वाद मनसे दरबारी गेल्यामुळे आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

प्रसाद वेदपाठक नेमकं काय म्हणाले? (Prasad Vedpathak On Sandip Deshpande)

इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक म्हणाला की, “आमचा विषय प्रॉपर्टी संबंधित होता, तिथे पांढरा पट्टा मारलेला… त्यानंतर तो पट्टा मिटवला मात्र त्यानंतर जे सुरु आहे, ते राजकारण… माझ्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला म्हणजे, चोराच्या उलटा बोंबा सुरू आहेत…”

“मनसेनं आमच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय, आमच्यासोबत ते उभे राहीले, प्रवीण छेडा यांनी आमच्या विरोधात आंदोलन केलं, सगळ्यात जास्त मतं मराठी माणसांची असतात, आश्चर्य वाटतं, त्यांनी आमच्या विरोधात आंदोलन केलंय…  एकच पक्ष आहे, मराठी माणसांसोबत ती मनसे आहे… त्यामुळे आज मी त्यांना भेटायला आलोय…”, असं इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक म्हणाला. 

“घरी काही लोक धमकविण्यासाठी येत आहेत, मागे पुढे लोक फिरतात… रेफ्युजी सारखं फिरावं लागतं,  माझ्या बाजूनं, भूमी पुत्रांच्या बाजूनं तिथे कोणी उभं राहात नाही, अख्खी सोसायटी माझ्या विरोधात गेलीय…”, असंही प्रसाद वेदपाठक म्हणाला. 

Prasad Vedpathak Meet Sandip Deshpande: पांढऱ्या पट्टीला विरोध करताच अख्ख्या सोसायटीने वाळीत टाकलं, जीवे मारण्याच्या धमक्या, प्रसाद वेदपाठकला मनसेचं संरक्षण, संदीप देशपांडे म्हणाले...

प्रसाद वेदपाठकच्या भेटीबाबत काय म्हणाले मनसे नेते संदीप देशपांडे? (Sandip Deshpande On Jain White Line Controversy)

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “तुम्ही नॉन व्हेज खायचं नाही… कबुतरांना खायला द्यायचं नाही, हा संस्कृतीक दहशतवाद झाला… राज ठाकरे सांगतात की, तुमचा धर्म चार भिंतीत ठेवा… त्यामुळे वेदपाठक कुटुंबाच्या पाठीशी मनसे आहे, छेडा-फेडानं हे लक्षात ठेवावं…”

“रस्त्याचं विद्रुपिकरण आम्ही होऊ देणार नाही, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारू शकत नाही,  जैन मुनी यांच्या पायाला थंडवा मिळावा म्हणून झाडे लावावीत, हिरवी झाडं लावा, आता नितेश राणे यांनी त्यावर आक्षेप घेऊ नये, कारण झाडाला रंग हा हिरवाच असतो… जैन मुनी निलेश चंद्र यांची मुलाखत पाहिली, त्यांना सांगायचं आहे, बॅक्टरियाला तुम्ही मारण्यासाठी अँटीबायोटिक घेताना, घरात ढेकूण झाले तर त्यांना मारण्यासाठी पेस्ट कंट्रोल करता ना?”, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai Jain Community White Line Controversy: गिरगावात शाह नावाच्या व्यक्तीकडून पांढरी पट्टी, मराठी नागरिक धावत गेले अन् अर्ध्यातच रोखलं, जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला

ABP Majha च्या बातम्या LIVE



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *