Who is Prince Yadav Debut Team India Against Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय (ODI) सामना आज 17 जून रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ सध्या 1-0 ने पुढे असून आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरली आहे. 2023 च्या विश्वचषकानंतर लखनऊमध्ये खेळवला जाणारा हा पहिलाच एकदिवसीय सामना आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्ष दुबे यांना विश्रांती देण्यात आली असून, त्यांच्या जागी प्रिन्स यादव, कुलदीप यादव आणि यशस्वी जयस्वाल यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.
Precious moments ✨
Congratulations to Prince Yadav as he receives his #TeamIndia ODI debut cap from Vice-captain Shreyas Iyer 🥳👏
Updates ▶️ https://t.co/JYJ5l44iJ6#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/dX9JYubQFH
— BCCI (@BCCI) June 17, 2026
कोण आहे प्रिन्स यादव? (Who is Prince Yadav Debut Team India)
या सामन्याचे सर्वात युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण. पहिल्या सामन्यात हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांना पदार्पणाची संधी मिळाली होती, तर आज दुसऱ्या सामन्यात प्रिन्स यादवला भारताची डेब्यू कॅप देण्यात आली आहे. प्रिंस यादवने आयपीएलमध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात पहिली आंतरराष्ट्रीय संधी मिळाली आहे.
वय लपवल्याचा कलंक आणि 2 वर्षांची बंदी (Prince Yadav Two-year ban for hiding age)
डिसेंबर 2019 मध्ये बीसीसीआयने (BCCI) प्रिंस यादववर वय लपवल्याप्रकरणी 2 वर्षांची कडक बंदी घातली होती. अंडर-19 क्रिकेट खेळण्यासाठी त्याने आपल्या जन्माचे प्रमाणपत्र 12 डिसेंबर 2001 असे दिले होते. मात्र, बीसीसीआयने जेव्हा सीबीएसई बोर्डाकडून (CBSE) पडताळणी केली, तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. प्रिंसने 2012 मध्येच 10 वीची परीक्षा पास केली होती आणि त्याची खरी जन्मतारीख 10 जून 1996 होती. या फसवणुकीमुळे त्याच्यावर बंदी आली आणि त्याचे करिअर संपले असे सर्वांना वाटले होते. पण, बंदीचा काळ संपल्यानंतर प्रिंसने हार मानली नाही. त्याने दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि दिल्ली प्रीमियर लीगमध्ये शानदार पुनरागमन केले. आयपीएलमध्ये त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 30 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात घेतले.
विराट कोहलीला कसा दिला चकमा? (Prince Yadav Virat Kohli Bowled ipl 2026)
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात प्रिंस यादवने जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीला अवघ्या 2 बॉलमध्ये शून्यावर क्लीन बोल्ड केले. प्रिंसने टाकलेला 140.4 वेगाचा इनस्विंगर चेंडू विराटला समजलाच नाही आणि तो थक्क होऊन पाहत राहिला. विशेष म्हणजे, खुद्द विराटनेच आधीच्या एका सामन्यादरम्यान प्रिंसला गोलंदाजीची दिलेली टीप प्रिंसने विराटविरुद्धच वापरली आणि त्याची विकेट घेतली. आयपीएल दरम्यान त्याने आपल्या भेदक वेगाने थेट ‘किंग’ विराट कोहलीला चकमा देत बाद केले होते. या एका विकेटने त्याला एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आणले.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला