Randeep Hooda : ‘हिंदू-मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणावर सुरू होते’ रणदीप हुड्डानं सांगितलं ‘छावा’ सिनेमातील औरंगजेबाची भूमिका नाकारण्याचं कारण


Randeep Hooda : रणदीप हुड्डानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘छावा’ सिनेमातील औरंगजेबाची भूमिका नाकारण्याचं कारण सांगितलं आहे.

Randeep Hooda On Rejecting Aurangzeb Role In Chhaava Movie
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडले. विकीसोबतच, अक्षय खन्नाच्या औरंगजेबाच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं आणि या भूमिकेनं अक्षयला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण, तुम्हाला माहित आहे का ‘छावा’मध्ये औरंगजेबाच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाला विचारणा झालेली. मात्र, अभिनेत्यानं ही भूमिका नाकारली. आता, रणदीपनं भूमिका नाकारण्यामागील कारण सांगितलंय.
Maharashtra TimesSandeep Pathak Exclusive : ‘लोक माझ्या दातांवर पंचेस मारायचे, मग मीच त्यावरून फिरकी घ्यायला लागलो’ संदीप पाठकनं सांगितला किस्सा

रणदीप हुड्डानं ‘छावा’ सिनेमातील औरंगजेबाची भूमिका का नाकारली?

झूमला दिलेल्या मुलाखतीत रणदीप हुडानं सांगितलं की, ‘छावा’ मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारण्यासाठी त्याला विचारणा झाली होती. भूमिकेला नकार देण्याचं कारण सांगताना रणदीप म्हणाला की, त्यावेळी मानसिक आणि भावनिक स्थितीमुळे त्यानं औरंगजेबाची भूमिका नाकारली होती. अभिनेत्यानं सांगितलं की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चं शूटिंग पूर्ण होऊन पोस्ट-प्रॉडक्शन सुरू झाल्यावर चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्याच्याशी लगेच संपर्क साधला.
Maharashtra TimesArya Babbar : ‘पैशांसाठी वडील पाहिजे असतात, पण मानसन्मान देण्याची वेळ येते तेव्हा वडील नको’ प्रतीक स्मिता पाटीलवर आर्य बब्बरचा संताप

हिंदू-मुस्लिम वादामुळे ‘छावा’ सोडला

रणदीपने सांगितलं की, सावरकर चित्रपटासाठी त्यानं आपल्या दिसण्यात मोठा बदल केला होता. रणदीप म्हणाला, ‘मी एका IP खटल्याचा सामना करत होतो आणि त्या संपूर्ण कथानकात हिंदू-मुस्लीम संबंधांविषयीची चर्चा आणि वादविवाद मोठ्या प्रमाणावर सुरू होते, अशा परिस्थितीत मला पुन्हा त्याच वाटेवर जायचं नव्हतं.’ अभिनेत्यानं सांगितलं की, त्यावेळी तो खूपच बारीक होता आणि त्यानं आपल्या आधीच्या भूमिकेसाठी केस कापले होते, ज्यामुळे त्याला लगेचच दुसरी आव्हानात्मक ऐतिहासिक भूमिका साकारणं कठीण झालं होतं.

दातांवरून पंचेस, चाहत्यांचं प्रेम; संदीप पाठक यांची भन्नाट किश्श्यांनी भरलेली मुलाखत

रणदीप हुड्डाचे सिनेमे

दरम्यान, रणदीप हुड्डाच्या कामाबद्दल सांगायचं तर अभिनेता अलीकडेच ‘इन्स्पेक्टर अविनाश २’ मध्ये दिसला होता. त्याचबरोबर अभिनेता लवकरच मराठी तमाशा आणि लावणी कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्यावर आधारित सिनेमामध्ये भूमिका साकारणार असून त्याच्यासोबत श्रद्धा कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. तसेच, रणदीपच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर, १० मार्च रोजी अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. योगायोगाने त्याचदिवशी रणदीपचे वडील रणबीर हुड्डा यांचा वाढदिवस देखील होता.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा