Donald Trump : भारताच्या जहाजावरील हल्ल्यात तीन निष्पाप भारतीयांचा मृत्यू, ट्रम्प यांची इराणवर आरोपांची तोफ, अखेर अमेरिकेला इराणनं आरसा दाखवला


नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ भारतीय जहाजावर हल्ला झाला होता. त्या हल्ल्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. भारताच्या जहाजावर इराणच्या ड्रोनकडून हल्ले करण्यात आले, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. भारतातील इराणच्या उच्चायुक्त कार्यालयाकडून ट्रम्प यांचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा पलटवार केला आहे. ट्रम्प यांच्याकडून अमेरिकन नागरिकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. अमेरिकेनं भारतीय नाविक असलेल्या तीन जहाजांवर हल्ले केले होते, ज्यात तीन भारतीय मारले गेले होते, असा दावा इराणनं केला होता. याशिवाय भारतानं नवी दिल्लीतील अमेरिकन उच्चायुक्तांना समन्स देखील देण्यात आलं होतं.  

इराणनं अमेरिकेचा दावा फेटाळला

भारतातील इराणच्या उच्चायुक्त कार्यालयानं एक्सवर पोस्ट करत म्हटलं की भारतीय जहाजावर होर्मुझच्या सामुद्रधुनीत झालेल्या हल्ल्याबाबत ट्रम्प यांनी केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये तीन भारतीयांना जीव गमवावा लागला होता. त्या घटनेपासून लक्ष विचलित करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं इराणनं म्हटलं.  

अमेरिकेने एका आठवड्यात तीन भारतीय जहाजांवर हल्ले केले. या हल्ल्यात तीन निष्पाप भारतीयांचा जीव गेला.इराणच्या उच्चायुक्त कार्यालयानं अमेरिकेचे हल्ले क्रूर आणि लाजीरवाणे असल्याचं म्हणत टीका केली. 

ट्रम्प यांचा इराणवर आरोप

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय नाविकांच्या जहाजांवरील हल्ल्यांच्या मागे इराण असल्याचा आरोप केला होता. इराणकडून करण्यात आलेले हल्ले पूर्णपणे चुकीचे आहेत, असं ट्रम्प म्हणाले. 

इराणच्या विदेश मंत्रालयाचा पलटवार

इराणच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी देखील अमेरिकेवर हल्लाबोल केला आहे. भारताच्या व्यापारी जहाजांवरील हल्ले म्हणजे अमेरिका पुरस्कृत सागरी लूट आणि सशस्त्र दरोड्याचा प्रकार आहे, अशी टीका बघाई यांनी केली.  इराणच्या विदेश मंत्र्यांनी ज्यांचा मृत्यू झाला त्यांना आदरांजली वाहिली.  

आंतरराष्ट्रीय संघटनांनी अमेरिकेला या हल्ल्यांसाठी जबाबदार ठरवण्याची मागणी इराणने केली. अमेरिकेचं कथित गैरवर्तन जागतिक शांतता, सागरी सुरक्षेसाठी धोकादायक आहे. यासाठी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई झाली पाहिजे, असं इराणकडून करण्यात आली.  

भारतीय नाविकांच्या मृत्यूवरुन आणि जहाजांवरील हल्ल्यांच्या मुद्यावरुन अमेरिका आणि इराण यांच्यात आरोप- प्रत्यारोप वाढले आहेत. एकीकडे ट्रम्प इराणला जबाबदार ठरवत आहेत. तर,  इराण अमेरिकेवर थेट हल्ल्याचे आरोप करतेय. यामुळं होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव वाढलेला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *