Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर आजच्या सामन्यामध्ये मैदानात उतरला आहे. लखनौ सुपर जायंट्सने त्याला शेवटच्या सामन्यामध्ये संधी दिली आहे. अर्जुन तब्बल ७३५ दिवसांंनी आयपीएल खेळणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आयपीएलमधील ६८ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असून पंजाबने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात लखनौ संघाने युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर याला संधी दिली असून प्लेइंग ११चा भाग असणार आहे. लखनौ संघाचा हा शेवटचा सामना असून ते प्ले ऑफ स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्जुनला संधी मिळाली नव्हती. आयपीएलमध्ये २०२४ मध्ये त्याने शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला एकदाही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर याने शेवटचा सामना लखनौविरूद्ध खेळला होता, जवळपास ७३५ दिवसांनंतर अर्जुन मैदानात खेळताना दिसणार आहे. आजच्या सामन्यामध्ये अर्जुन कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असणार आहे. आयपीएल २०२६ मध्ये लखनौ संघाने अर्जुनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. याआधी तो मुंबई इंडियन्सचा भाग राहिला होता, यंदाच्या सीझनमध्ये अर्जुन मैदानात उतरेल असं सर्वांना वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. अर्जुन तेंडुलकर याने सहा सामन्यांमध्ये तीन विकेट घेतल्या असून त्याची सर्वोच्च धावसंख्या १३ आहे. SRH vs RCB : विराट आणि हेडमध्ये काहीतरी वाजणार, मुरलीधरन आणि व्हिक्टोरीला आधीच आलेला अंदाज; व्हायरल Video मध्ये सगळं दिसलं सामन्यात ‘पंजाब’चे ६ विजय, ६ पराभव आणि १ अनिर्णित, तर ‘लखनऊ’चे ४ विजय आणि ९ पराभव झाले आहेत. पॉइंट टेबलमध्ये ‘पंजाब’ १३ गुणांसह पाचवे, तर ‘लखनऊ’ ८ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. हेड टे हेडमध्ये ‘पंजाब’ आजचा सामना जिंकून पहिल्या चार संघात येऊ शकतात. मात्र आगेकूच निश्चित होण्यासाठी अखेरच्या सामन्यांत ‘राजस्थान’ची हार आवश्यक तसेच ‘कोलकाता’चा विजय मोठ्या फरकाने नको. ‘लखनौ’चे आव्हान संपुष्टात आले आहे. Virat Kohli : विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या वादात चूक कोणाची? इरफान पठाणची बोलकी प्रतिक्रिया, काय म्हणाला? गेल्या पाच सामन्यांमध्ये लखनौने दोन विजय आणि तीन पराभव, तर ‘पंजाब’ची पाचही सामन्यांत हार झाली आहे. खेळपट्टीचा अंदाज पाहिला तरल फलंदाज तसेच गोलंदाजांना समान साथ देणारी खेळपट्टी. सुरुवातीस चेंडू चांगला उसळतो, त्याचा फटकेबाजीस फायदा. डावाच्या मध्यास फिरकी गोलंदाज प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा