Pranit More Controversy: स्टँड – अप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) आपल्या ऑडियन्समुळे चांगला कचाट्यात सापडला आहे. त्याच्या शोमध्ये हिमांशू जांगडा (Himanshu Jangra) आणि डॉ. सेजल पवार (Sejal Pawar) या दोघांनीही अश्लील टिपण्णी केली होती. दोघांच्याही विधानांवर आक्षेप घेण्यात आला. या दोघांचेही व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. हिमांशूनं एका तरुणीला डेटवर नेल्याचा किस्सा सांगितला. तर, डॉ. सेजल पवार हिनं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अश्लील टिपण्णी केली.
यामुळे प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ झाली. गेल्या 2 दिवसांपासून त्याला धारेवर धरण्यात आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही प्रणित मोरेच्या शोविरोधात अॅक्शन घेतली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, या सगळ्या गदारोळानंतर प्रणित मोरेनं अखेर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली आहे.
स्टँड अप कॉमेडीयन प्रणित मोरे याच्याकडून अखेर माफीनामा जाहीर (Pranit More Apologises Amid Controversy in Video)
प्रणित मोरेनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन सांगितलं की, ‘हॅलो, खरंतर मला ही गोष्ट काही दिवसांपूर्वीच बोलायची होती. पण माझं इन्स्टाग्राम सस्पेंड झालं होतं. तुम्ही सर्वांनी माझा क्राऊड वर्कचा व्हिडीओ पाहिला असेल. या व्हिडीओमुळे माझा लोकांकडून तिरस्कार केला जात आहे. मला असं वाटतं की, हा तिरस्कार मी डिझर्व्ह करतोय. कारण त्या तरुणासोबत जेव्हा मी क्राऊडवर्क करत होतो. तेव्हा त्यानं बऱ्याच अपमानास्पद गोष्टी बोलल्या. सर्व जण त्यावर हसत होते’.
प्रणित मोरेचा माफिनाम्याचा व्हिडीओ व्हायरल (Pranit More Apologies)
‘मी देखील भावनेच्या भरात वाहून गेलो होते. तेव्हा माझ्याकडून चूक झाली. मी त्याला थांबवू शकलो असतो, एक बाजू घेऊ शकलो असतो, पण मी ही गोष्ट करु शकलो नाही. मी त्याला प्लॅटफॉर्म दिला आणि हे सगळं एवढं वाढत गेलं. जे कुणी यामुळे दुखावले गेले असतील, त्यांच्या सगळ्यांची मी माफी मागतो’
‘कायदेशीर कारवाईला मी सहकार्य करतो. मला एक संधी द्यावी, मी एक चांगला माणूस बनून दाखवेन. मी माझ्या स्वतःवर आणि माझ्या कॉन्टेंटवर काम करेन’, असं म्हणत प्रणित मोरेनं माफी मागितली. दरम्यान, प्रणित मोरेच्या माफिनाम्यानंतर त्यावर कोणती कारवाई केली जाईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
स्वामींची कृपा.. ‘देऊळ बंद 2’ सिनेमाची दमदार कमाई, शुक्रवारी कमावले ‘इतके’ कोटी
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष