Ram Kapoor: टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) सध्या चर्चेत आहे. ‘लॉकअप’ या रिॲलिटी शोमधील त्याच्या वागण्यावरून प्रेक्षकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आधी लग्नात चीटिंगला सामान्य म्हटल्यानंतर आता त्याने इन्फ्लुएंसर वरुण यादव उर्फ लैलाला किस केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्याच्या या प्रकारावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
राम कपूरने ओलांडली मर्यादा?
‘लॉकअप’च्या मागील भागात काही स्पर्धक गार्डन एरियामध्ये बसून गप्पा मारत होते. त्यावेळी राम कपूरने आपल्या शेजारी बसलेल्या लैलाला मिठीत घेतलं आणि तिच्या गालावर किस केलं. मात्र तो तिथेच थांबला नाही. त्यानंतर त्याने लैलाला लिप-टू-लिप किस केल्याचंही दिसलं.राम कपूरने खरंच लिप किस केलं की फक्त तसं दाखवलं, हे स्पष्ट नाही. पण कॅमेऱ्यात दिसलेल्या दृश्यांमुळे त्याने प्रत्यक्ष किस केल्याचाच अंदाज व्यक्त केला जात आहे. राम कपूरचा हा अवतार पाहून गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा देखील चकित झाली. तिच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य स्पष्ट दिसत होतं.
लग्नात चीटिंगलाही दिलं समर्थन
याआधी राम कपूरने लग्नात चीटिंगला योग्य ठरवल्यामुळेही तो चर्चेत आला होता. त्याने म्हटलं होतं की, नातं तुटण्यापेक्षा ते पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्याच्या मते, जर एखादं जोडपं खरंच एकमेकांवर प्रेम करत असेल, तर नात्यात अशी कोणतीही गोष्ट नसते जी पूर्णपणे डील ब्रेकर ठरू शकते. या वक्तव्यामुळेही त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.आता पुढे ‘लॉकअप’मध्ये राम कपूर आणखी काय करतो, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
Lock Upp Season 2 gave us one of TV’s most shameless misogynists : Ram Kapoor.
The man who joked about gang rape on National TV [Video 1] is now preaching that women should tolerate cheating & stay in broken marriages “for the sake of family.” [Video 2]
Women are not… pic.twitter.com/bt5siJGVRR
— The Lie Lamaa 🏹 (@The_LieLamaa) June 30, 2026
ही व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे.अनेकांनी रामच्या मतावर संताप व्यक्त केला असून अनेकांनी त्याला ट्रल करायला सुरुवात केली आहे. ‘राम कपूरचे डोके फिरले आहे .त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे’अशा प्रकारच्या कमेंट्स सोशल मीडियावर उमटत आहेत.फराह खान आणि रितेश देशमुख यांचे सूत्रसंचालन असलेल्या लॉकअप सच या सजा या शोमध्ये अनेक अभिनेते इन्फ्लुएन्सर्स आणि टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.या शोचे नवीन एपिसोड दर शनिवार ते बुधवार रात्री आठ वाजता नेटफ्लिक्सवर रिलीज होतात.
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा