13 वर्षांनी मोठ्या हिरोशी ब्रेकअप, टीव्हीच्या सर्वांत महागड्या अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा; कोण आहे जोडीदार? – Marathi News | Shivangi joshi engagement after breakup with kushal tandon revealed in lock upp 2


शिवांगी जोशी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या गाजलेल्या मालिकेनंतर तिने ‘बडे अच्छे लगते हैं 2’मध्ये काम करून घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकांमध्ये संस्कारी मुलगी आणि सुनेची भूमिका साकारणारी शिवांगी सध्या ‘लॉक अप 2’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या शोमध्ये तिने तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल मोठा खुलासा केला आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये शिवांगी जोशी आणि श्रेया कालरा या दोघी लग्नाबद्दल एकमेकींशी बोलत असतात. तेव्हा शिवांगी तिच्या नात्याबद्दलचा खुलासा करते.

श्रेया शिवांगीला विचारते की, ती जोडीदाराच्या शोधात आहे का? त्यावर शिवांगी तिला म्हणते की, मला आता थेट लग्नच करायचं आहे. तेव्हा तिला कसा पार्टनर हवा आहे, असं श्रेया विचारते. यावर उत्तर देताना शिवांगी तिला सांगते की, मी एंगेज्ड आहे. म्हणजेच शिवांगीने साखरपुडा केला आहे. मात्र यावेळी ती व्यक्ती कोण आहे, काय करते, इंडस्ट्रीतला आहे की नाही, याविषयी तिने काहीच माहिती श्रेयासमोर उघड केली नाही. शिवांगीचा हा खुलासा ऐकून श्रेयासुद्धा पेचात पडते. या दोघींमधील हा संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

याआधी शिवांगी ही अभिनेता कुशल टंडनला डेट करत होती. या दोघांनी ‘बरसातें’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. कुशल आणि शिवांगी यांनी जाहीररित्या आपलं प्रेमसुद्धा व्यक्त केलं होतं. या दोघांच्या लिपलॉकचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. मात्र नात्यावर शिक्कामोर्तब केल्याच्या काही महिन्यांतच त्यांचा ब्रेकअप झाला. चाहत्यांसाठी ही खूप धक्कादायक बातमी होती. कारण शिवांगी आणि कुशलच्या जोडीला चाहते खूप पसंत करत होते.

कुशलने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ब्रेकअपविषयीची माहिती दिली होती. मात्र शिवांगीने तिच्या ब्रेकअपविषयी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. कुशलसोबतच्या ब्रेकअपनंतर शिवांगीचं नाव ‘बडे अच्छे लगते हैं 2’ मालिकेतील सहअभिनेता हर्षद चोपडाशी जोडलं गेलं. हर्षदला शिवांगीच्या घरी गणपती पूजेदरम्यानही पाहिलं गेलं होतं. आता दोघंही ‘लॉक अप 2’मध्ये आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *