Raksha Bandhan 2026: राखी बांधताना किती गाठ बांधणे शुभ मानले जाते? प्रत्येक गाठीचा अर्थ काय? ‘या’ गोष्टी कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता सांगते…


Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन… एक असा सण ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. आणि आता अनेकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण अवघ्या काही तासांवर हा सण येऊन ठेपलाय. पंचांगानुसार, यंदा रक्षाबंधनाचा सण, 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी तसेच त्याच्या आयुष्यात कोणतेही दुःख येऊ नये यासाठी प्रार्थना करतात. भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात. मात्र या तुम्हाला हे माहितीय का, राखी बांधताना किती गाठी शुभ असतात? प्रत्येक गाठीचा अर्थ काय आहे? धार्मिक मान्यता काय सांगते? सविस्तरपणे जाणून घेऊया.

राखीच्या प्रत्येक गाठीमागे दडलंय रहस्य? किती गाठी सर्वात शुभ? (Raksha Bandhan 2026)

आधुनिक काळातही रक्षाबंधन हा कौटुंबिक नात्यांमधील प्रेम आणि एकोप्याची जाणीव करून देणारा महत्त्वाचा सण मानला जातो. रक्षाबंधनाचा अर्थ केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून परस्पर प्रेम, आपुलकी, आदर आणि जबाबदारी जपणे हा त्यामागील मुख्य संदेश आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. पण राखी बांधताना नेमक्या किती गाठी बांधल्या पाहिजे? तुम्हाला प्रत्येक गाठीचा अर्थ माहित आहे का? आज आपण जाणून घेऊया की रक्षाबंधनच्या दिवशी किती गाठी बांधल्या पाहिजेत.

राखी बांधताना किती गाठी बांधणे शुभ मानले जाते?

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची कामना करते. हिंदू परंपरेनुसार राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते. या तीन गाठी प्रेम, संरक्षण आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. काही धार्मिक परंपरांमध्ये तीन गाठींचा संबंध ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांशीही जोडला जातो. त्यामुळे राखी बांधताना तीन गाठी बांधण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. मात्र, कुटुंबाच्या किंवा स्थानिक परंपरेनुसार गाठींची संख्या वेगळी असू शकते.

राखीची पहिली गाठ – राखीची पहिली गाठ ही विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मदेवाला समर्पित असल्याचे मानले जाते. ही गाठ बांधून, भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते.

राखीची दुसरी गाठ – राखीची दुसरी गाठ ही रक्षक भगवान विष्णूला समर्पित असल्याचे मानले जाते. ही गाठ बांधताना, बहीण आपल्या भावाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश मिळावे यासाठी मनातल्या मनात प्रार्थना करते.

राखीची तिसरी गाठ – राखीची तिसरी गाठ भगवान शिवाला समर्पित आहे आणि भाऊ वाईट शक्ती व संकटांपासून सुरक्षित राहावा या इच्छेने ती बांधली जाते. ही गाठ पत्नीसाठी संरक्षक ढाल म्हणून काम करते.

राखीच्या 5 गाठींचा अर्थ काय?

धार्मिक मान्यतेनुसार, रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी काही कौटुंबिक परंपरांमध्ये 5 गाठी बांधण्याचाही सल्ला दिला जातो. या गाठी निसर्गाच्या पाच तत्त्वांशी (पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश) संबंधित आहेत. या पाच गाठी भावाच्या आयुष्यात स्थिरता, शीतलता, धैर्य, सकारात्मकता आणि मोठे मन प्रदान करतात.

राखीला किती गाठी बांधणे शुभ मानले जाते?

धार्मिक मान्यतेनुसार, रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधताना योग्य संख्येने गाठी मारणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. साधारणपणे तीन गाठी मारण्याची शिफारस केली जाते. भावाला दीर्घायुष्य, संरक्षण, सुख आणि समृद्धीच्या शुभेच्छांसह ही राखी बांधली जाते. भाऊ-बहिणीचे नाते अढळ प्रेम, विश्वास आणि आदराने भरलेले राहावे, अशी इच्छा व्यक्त केली जाते. राखीला तीन गाठी मारणे हे या गोष्टीचे प्रतीक आहे की, भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे आपले कर्तव्य नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

राखीला गाठी मारताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा.

  • राखीला गाठी मारताना आपले मन शांत ठेवा. 
  • गाठी मारताना देवाचे ध्यान करा
  • मनातल्या मनात एका मंत्राचा जप करा. 
  • तो मंत्र आहे ‘ॐ रक्षं च रक्षाय’

हेही वाचा :

रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचे 3 सर्वात शुभ मुहूर्त! ‘या’ मुहूर्तांचे महत्त्व कमी लोकांना माहित, पूजा पद्धत, धार्मिक मान्यता…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *