Vinod Kambli Wife: विनोद कांबळीची पहिली पत्नी काय करते? घर चालवण्यासाठी निवडलं असं काम.. – Marathi News | Vinod kambli first wife noella lewis what work she does doing to survive after divorce


Vinod Kambli First Wife: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा त्याच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. त्याने एका वृद्धाश्रमातून स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला वृद्धाश्रमात पाहून चाहते त्याच्याबद्दल चिंतीत आहेत. मात्र, या व्हिडिओमध्ये हा माजी क्रिकेटपटू त्या केंद्रातील सुविधांची प्रशंसा करताना दिसत आहे. विनोद कांबळींची अवस्था इतकी बिकट असूबनही ते वृद्धाश्रमात का राहत आहे? घरी का राहत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. तसेच त्यांची बायको काय करते? ती का विनोद कांबळी यांची काळजी घेत नाही? त्यांची पत्नी कुठे आहे? ती सध्या काय करते असे अनेक प्रश्न आता चाहत्यांना पडले आहेत?

विनोद कांबळी यांची पहिली पत्नी नोएला लुईस सध्या पुण्यातील कारागृह मंत्रालयात कार्यरत आहेत. ती पुणे ख्रिश्चन सिमेट्री सोसायटीशीही संबंधित आहे आणि सामाजिक कार्यात योगदान देते. याव्यतिरिक्त, नोएला लेडीबर्ड इव्हेंट्समध्ये सक्रिय आहे आणि कार्यक्रमांचे व्यवस्थापन करते. ती समाजाच्या सुधारणेसाठी कटिबद्ध आहे. विनोद कांबळी यांचे पहिले लग्न फक्त दोन वर्षच टिकले त्यानंतर दोघेही विभक्त झाले.

पहिल्या लग्नानंतर कांबळी हे फॅशन मॉडेल अँड्रिया ह्युइट हिच्यात पुन्हा प्रेम पडले. सहा वर्षांच्या डेटिंगनंतर २००६ मध्ये विनोद आणि अँड्रिया यांनी लग्न केले. या कठीण काळात अँड्रिया आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. सध्या विनोद कांबळी हे वृद्धाश्रमात असल्याने त्यांची पत्नी त्यांची काळजी का घेत नाही असा सवाल उपस्थित झाला होता. तर तिचीही प्रकृती फार काही चांगली नाही. तसेच मुलांचाही सांभाळ करायचा असतो, यामुळे विनोद कांबळीकडे लक्ष द्याला जमत नाही. यामुळे विनोद कांबळी यांना वृद्धाश्रमात दाखल केले आहे कारण त्यांचे हाल होऊ नये, आणि तिथे त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात आहे.

काही महिन्यांपूर्वी अँड्रिया ह्युइटने विनोद कांबळीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या दाव्यानुसार, एका वादादरम्यान, विनोद कांबळीने तिच्यावर भांडे फेकले, ज्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेला माध्यमांमध्ये मोठे स्थान मिळाले. विनोद कांबळीशी लग्न होण्यापूर्वीही, अँड्रिया एक लोकप्रिय ‘पेज ३’ स्टार होती, जी प्रसिद्ध मासिकांमध्ये जाहिरात करायची.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *