त्याने पुढे सविस्तर सांगितले, “जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आधीच यशस्वीपणे केलेली असते, तेव्हा तुमच्यात एक प्रकारचा ओव्हर-कॉन्फिडन्स किंवा निष्काळजीपणा येतो. ‘हे काम तर मी आधीच केले आहे, आता काय नवीन करायचे?’ असा विचार मनात येतो. यामुळे माझ्या अभिनयाचा दर्जा घसरला असता आणि फरहान या पात्राने मला जे नाव मिळवून दिले, ते खराब झाले असते. मला प्रेक्षकांच्या मनात माझी जुनी इमेज धुळीस मिळवायची नव्हती.”
