जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले


मुंबई : राज्यातील फडणवीस सरकारचे यंदाच्या वर्षातील पावसाळी अधिवेशन पार पडले, मात्र यंदाही विरोधी पक्षनेतेपदी कोणाचीही निवड करण्यात न आल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. आता, पुढील अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपूरला होणार आहे. त्यामुळे, पुढील अधिवेशनापर्यंत तरी सरकारने विरोधी पक्षनेते पदी विरोधी पक्षातील नेत्याची निवड करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar jadhav) आणि राष्ट्रवादीच्या जयंत पाटील (Jayant patil) यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.  

महावविकास आघाडीत सर्वाधिक प्रतिनिधी असलेल्या पक्षाचा गटनेता म्हणून मी आहे, मी समन्वय ठेवला आहे. आमच्यात अंतर्गत वाद नाही. विरोधी पक्षनेत्यासंदर्भात बोलायचं तर सदस्य संख्या याची अट नाही, असं पत्र सचिवांकडून आपण घेतलं आहे. आम्ही तिघे मिळून चार-चार वेळा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांना भेटलो. आता करायचं काय? अजून किती लाचारी करत त्यांच्या समोर यायचं? किती डोकं फोडायचं? असा संतप्त सवाल भास्कर जाधव यांनी विचारला. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला.  

विरोधी पक्षनेता नव्हे तर पक्ष विरोधी नेता

विधिमंडळासाठी विरोधी पक्षनेता त्यांना द्यायचा नाही आहे, कारण त्यांना पक्षविरोधी नेता मिळाला आहे, आता काय करायचं हे त्यांनीच ठरवायचं आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. तसेच, नाव न घेता सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. पक्षविरोधी नेत्यांबरोबर आमची उघडपणे चर्चा होत असते, इकडे बसण्याऐवजी ते तिकडे बसतात, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री भाषण करताना तीन इंजिनपैकी एक इंजिन गायब होतं, असे म्हणत विधानसभा सभागृहात एक उपमुख्यमंत्री अनुपस्थित असल्याकडे काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी लक्ष वेधले.

शेतकरी कर्जमाफीचे स्वागतच

पालकमंत्र्यांना हाताला लागलं याचे समर्थन करु शकत नाही, मंत्र्यांना हात लावू शकतात हे दिसून आलं. कर्जमाफी कोणत्याही अटीशिवाय द्या अशी मागणी आमची होती, त्याबाबत शासकीय ऑर्डर निघेल, आम्ही कर्जमाफीचं स्वागतच करू अशी भूमिका भास्कर जाधव यांनी घेतली. तसेच, आज जी घोषणा केली आहे, त्यात रोहित पवार आणि बऱ्याच लोकांनी आंदोलनं केली आहेत, त्यात सरसकट कर्जमाफी सारखी असेल तर स्वागतच करु. 7/12 कोरा कोरा कोरा अशीच मागणी आमची आहे, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले. दरम्यान, अधिवेशनात आम्ही मिसिंग लींकसंदर्भात बोललोच ना, आज मात्र बोलताना त्यांनी स्टान्स बदलला याचा आनंदच आहे, असे म्हणत भास्कर जाधव यांनी आजच्या मुख्यमंत्र्‍यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. 

हेही वाचा

खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी ‘व्हे पर्मिएट पावडर’ जप्त; मराठवाड्यात कारवाई



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *