आजकाल धावपळ आणि कामाचे दीर्घ तास यामुळे अनेक जण रात्री उशीरा जेवतात. आहारतज्ज्ञांच्या मते, याचं उत्तर व्यक्तीनुसार वेगळं असू शकतं. कारण रात्री उशीरा जेवण्याचा परिणाम हा तुमचं आरोग्य, जीवनशैली आणि आधीपासून असलेल्या काही वैद्यकीय समस्यांवर अवलंबून असतो.
युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या मते, ॲसिड रिफ्लक्स किंवा मधुमेहासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी रात्री उशीरा जेवणं त्रासदायक ठरू शकतं. झोपण्यापूर्वी अगदी थोडा वेळ आधी अन्न खाल्ल्यानं पोटातील ॲसिड वरच्या दिशेनं येऊ शकतं, ज्यामुळे छातीत जळजळ होणं, आंबट ढेकर येणं आणि घशात जळजळ होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, अशा व्यक्तींनी झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास आधी रात्रीचं जेवण होईल याची काळजी घ्या.
मधुमेही रुग्णांसाठीही रात्री उशिरा जेवणं हानिकारक ठरू शकतं. अनियमित वेळी जेवल्यानं रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात. याचा परिणाम झोपेवर होतो आणि दुसऱ्या दिवशी भूक लागण्याच्या पद्धतीतही असंतुलन होऊ शकतं. अशा व्यक्तींनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रात्रीच्या जेवणाची वेळ निश्चित करावी. आरोग्य चांगलं असेल आणि कोणताही गंभीर आजार नसेल, तर अधूनमधून उशीरा जेवणे ही फार मोठी समस्या मानली जात नाही.
केवळ सवयीमुळे किंवा कंटाळा आला म्हणून खाणं टाळावं, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला. सर्वात आधी, खरंच भूक लागली आहे का हे तपासा.
रात्रीच्या वेळी काय खाणं टाळावं समजून घेऊया. कारण रात्री काय खावं, त्याप्रमाणेच कधी खाता इतकंच महत्त्वाचं आहे. ‘ॲसिड रिफ्लक्स’चा म्हणजेच आम्लपित्ताचा त्रास होत असेल, तर झोपण्यापूर्वी तळलेले पदार्थ, मांस, चीज, अंडी किंवा दुग्धजन्य पदार्थांचं अतिसेवन टाळावं. त्याऐवजी, सुकामेवा, नट बटर किंवा वनस्पती-आधारित हलके स्नॅक्स हे अधिक चांगले पर्याय ठरू शकतात.
विशेषतः मधुमेहींनी प्रथिनं, तंतूमय पदार्थ आणि आरोग्यदायी मेद म्हणजेच हेल्दी फॅट्स यांचा समतोल असेल, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील. रात्री उशीरा साखरयुक्त किंवा कर्बोदकं कार्बोहायड्रेट्स जास्त असलेले पदार्थ खाणं दातांच्या आरोग्यासाठीही हानिकारक मानलं जातं. कारण अशा पदार्थांमुळे तोंडात बराच वेळ साखर राहते, ज्यामुळे दातांची कीड लागण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, रात्री काहीही खाल्ल्यानंतर दात घासणं आणि स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे.