Health Tips : शरीर देतं पोषक घटकांच्या कमतरतेचे संकेत, आहारातल्या बदलांमुळे टाळू शकता आरोग्याच्या समस्या | लाइफस्टाईल बातम्या


Last Updated:

चुकीची आहारपद्धती, अति ताणतणाव आणि पॅकेज्ड म्हणजेच प्रक्रिया केलेले अन्न जास्त खाणं यामुळे पोषक घटकांची कमतरता निर्माण होण्याचं प्रमाण वाढतं. या गोष्टी हळूहळू घडत असल्यानं अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. इथे काही लक्षणांची यादी दिली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही लक्षणं दिसत असली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

News18
News18

मुंबई : खूप श्रमामुळे थकवा येतो, आजारपणातून बरं होतानाही थकवा जाणवतो पण तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल किंवा नखं सहज तुटत असतील, तर शरीरातील एखाद्या पोषक घटकाच्या कमतरतेचं ते लक्षण असू शकतं.

चुकीची आहारपद्धती, अति ताणतणाव आणि पॅकेज्ड म्हणजेच प्रक्रिया केलेले अन्न जास्त खाणं यामुळे पोषक घटकांची कमतरता निर्माण होण्याचं प्रमाण वाढतं. या गोष्टी हळूहळू घडत असल्यानं अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. इथे काही लक्षणांची यादी दिली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही लक्षणं दिसत असली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.

पहिलं लक्षण म्हणजे सतत जाणवणारा थकवा. रात्रीची पूर्ण झोप घेऊनही जर सुस्ती किंवा थकवा कायम राहत असेल, तर ते शरीरातील आवश्यक पोषक घटकांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. कालांतरानं, याचा परिणाम ऊर्जेच्या पातळीवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर होऊ लागतो.

दुसरं लक्षण म्हणजे केसांची अति प्रमाणात होणारी गळती. ऋतू बदलाच्या काळात थोडेफार केस गळणं सामान्य असलं, तरी सतत आणि मोठ्या प्रमाणात केस गळत असतील तर हे शरीरातील एखाद्या अंतर्गत कमतरतेचे परिणाम असू शकतात. केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळत नाही, तेव्हा त्यांच्या नैसर्गिक वाढीच्या चक्रात अडथळा निर्माण होऊ लागतो.

तिसरं लक्षण म्हणजे वारंवार तोंड येणं किंवा ओठ फाटणं. याकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करतात, पण प्रत्यक्षात हे शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. वरून लावायच्या औषधांमुळे कदाचित आराम मिळत असेल, तरीही मूळ कारण तसंच राहतं. चौथं लक्षण म्हणजे हात-पायांना मुंग्या येणं किंवा बधीरपणा जाणवणं.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, कारण ते मज्जातंतूशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकतात. याकडे लक्ष दिलं नाही तर कालांतरानं ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. पाचवं लक्षण म्हणजे त्वचा पिवळसर होणं आणि नखं ठिसूळ होणं. चेहरा फिकट दिसू लागला किंवा नखं ​​वारंवार तुटू लागली, तर ते शरीरातील आवश्यक पोषक घटकांच्या कमतरतेचं लक्षण आहे.

पोषक घटकांची कमतरता एका साध्या रक्त तपासणीद्वारे शोधता येतात. योग्य वेळी आहारात बदल करणं किंवा आवश्यकतेनुसार पूरक आहार म्हणजेच सप्लिमेंट्स घेणं यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या टाळण्यास मदत होऊ शकते. शरीराचे सूक्ष्म संकेत समजून घेणं हे उत्तम आरोग्याच्या दिशेनं टाकलेले पहिलं पाऊल आहे. त्यामुळे या संकेतांकडे दुर्लक्ष करु नका.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *