जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ख्याती असलेलं बीसीसीआय लवकरच भारतीय खेळाडूंना नेपाळ दौऱ्यावर पाठवण्याच्या तयारीत आहे. सचिव देवजित सैकिया यांनी भारत अ संघाचा नेपाळ दौरा होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. (PC-GETTY IMAGES)
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नेपाळमधील क्रिकेटची लोकप्रियता वाढलेली पाहून बीसीसीआय नेपाळ क्रिकेट बोर्डाला पाठिंबा देईल. तसेच अ संघ तिथे पाठवणं एक मोठं पाऊल असेल. बीसीसीआयने याचे संकेत दिले आहेत. (PC-GETTY IMAGES)
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने खुलासा केला होता की, नेपाळ क्रिकेट बोर्डाने भारत अ संघाला नेपाळमध्ये पाठण्याबाबत बीसीसीआयशी संपर्क साधला होता. रिपोर्टनुसार भारत अ संघ नेपाळमध्ये किर्तीपूर येथे तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामना 9, 11 आणि 13 डिसेंबरला होणार आहेत. (PC-GETTY IMAGES)
भारत अ संघ नेपाळ दौऱ्यावर गेला तर या संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश असण्याची शक्यता आहे. वरिष्ठ स्तरावरील त्याची कामगिरी पाहता तो आगामी स्तरासाठी तयार असल्याचं वाटत नाही. त्यामुळे त्याला भारत अ संघात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. (PC-GETTY IMAGES)
वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध तीन टी20 सामने खेळला असून त्यात अपयशी ठरला आहे. त्याने पहिल्या टी20 सामन्यात 14, दुसऱ्या टी20 सामन्यात 13 आणि तिसऱ्या टी20 सामन्यात 15 धावा केल्या आहेत. (PC-GETTY IMAGES)




