मला ऑफर आली तर… त्या 8 खासदारांबाबतही अमोल कोल्हे काय म्हणाले, तातडीची पत्रकार परिषद घेत.. – Marathi News | Amol Kolhe made significant statement regarding the 8 MPs of the Nationalist Congress Party


शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यानंतर एक आमदारही एकनाथ शिंदेंच्या गळ्याला लागला. ठाकरे गटातील काही आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. एका मागून एक मोठे धक्के शिवसेना ठाकरे गटाला बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून दुसऱ्या आठवड्यात दुसरा मोठा धक्का ठाकरे गटाला देण्यात आला. बंडखोरी खासदारांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या. या सभा घेऊन उद्धव ठाकरे मुंबईत दाखल होताच सचिन आहिर यांनी थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. सचिन आहिर हे आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळचे नेते समजले जायचे. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने मोठा दणका बसला. शिंदे गटात प्रवेश करताच सचिन आहिर यांना थेट उपसभापतीपद मिळाले. यादरम्यानच खासदार अमोल कोल्हे बंडखोरी करणार असल्याची चर्चा रंगताना दिसली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीबद्दल वक्तव्य केले. ज्यानंतर अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. यावर आता अमोल कोल्हे बोलताना दिसले. अमोल कोल्हे म्हणाले की, मी रेल्वेच्या प्रश्नावर बोलत होतो आणि तशी काही ऑफर आहे का? असा प्रतिप्रश्न केला होता. त्यानंतर सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये वेगळा अर्थ काढला गेला.

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेबद्दलचा तो प्रश्न होता आणि त्याच्यावर माझे उत्तर होते. ऑफरवर विचार करू, या माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला. पुणे नाशिक रेल्वेसंदर्भात माझे विधान होते. कधी कधी मला वाटते की, काही लोक दिवसा स्वप्न बघतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष एकत्रच आहे आणि एकत्रच राहिल. मी एका वाक्यात सांगतो की, शरद पवार जे सांगतील ते धोरण आणि म्हणतील ते तोरण.

ही चर्चा कायम होत राहते. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आमचे 8 ही खासदार आम्ही ठामपणे एकत्र आहोत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणे एकत्र आहोत. त्यामुळे ज्यावेळी अशा काही काही चर्चा आणि वाबड्या उडतात, त्यावेळी फारसे लक्ष देत नाही. आम्ही पक्षात असून आमच्यापर्यंत अशा काही सूचना येत नाहीत. किंवा आमच्या काही गट आहेत, हे आम्हालाच माहिती नसते. पण सूत्रांना मात्र माहिती असते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *