Praveen Tarde On Snehal Tarde: मराठी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) सिनेमापाठोपाठ आलेल्या ‘देऊळ बंद 2’ (Deool Bandh 2) सिनेमानं रिलीज होताच इतिहास रचला. या सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरशः भूरळ घातली. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली असून, 52 दिवस उलटूनही सिनेमाची क्रेझ काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. ‘देऊळ बंद 2’नं 52 व्या दिवशी, म्हणजेच आठव्या शनिवारी, 4 लाख रुपयांची कमाई केलीय, तर 51 व्या दिवशी ही कमाई 1 लाख रुपये इतकी होती. यावरून शनिवारी कमाईमध्ये तब्बल 300 टक्क्यांची मोठी वाढ झाल्याचं दिसून येतंय. या सिनेमाचं एकूण नेट कलेक्शन 74.07 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर एकूण ग्रॉस कलेक्शन 87.4 कोटी रुपये इतकं झालंय. नुकतीच या सिनेमाच्या सक्सेस पार्टी आयोजन करण्यात आलेलं. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी पार्टीसाठी हजेरी लावलेली.
‘देऊळ बंद 2’च्या सक्सेस पार्टीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातल्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडीओमध्ये प्रवीण तरडे यांनी एक वक्तव्य केलंय, जे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या पुढच्या माझ्या कुठल्याच सिनेमात स्नेहल नसेल, असं प्रवीण तरडे म्हणाले आहेत.
प्रवीण तरडे नेमकं काय म्हणाले? (Praveen Tarde On Snehal Tarde)
‘देऊळ बंद 2’ सिनेमाच्या रेकॉर्डब्रेक कमाईनंतर या सिनेमाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं. या सक्सेस पार्टीत एक गंमतीशीर किस्सा घडला. सिनेमाची मुख्य अभिनेत्री स्नेहल तरडे यांना त्यांचे पती आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गुडघ्यावर बसून सर्वांसमोर गुलाबाचं फुल दिलं. त्यानंतर प्रवीण तरडे म्हणाले की, “या हिरोईनने मला 100 कोटी दिले. त्यामुळे मी तिचा कायम ऋणी राहील. आता ती नसेल माझ्या कुठल्या सिनेमात. 100 कोटीची हिरोईन मला परवडणार नाहीये मित्रांनो. काय तुझं म्हणणं काय यावर?”
यावर स्नेहल तरडेनं उत्तर दिलं की, “असं वाटतंय का? मी तुला करुन देईल कोणाबरोबर… हे बघ, दुसऱ्या कुठल्या रोलला कुणीही काहीही घे, पण तुझ्या बायकोचा रोल असेल तर दुसरी कोणी चालणार नाही…” हे ऐकताच प्रवीण म्हणाले, “झालं, इथून पुढे बिना बायकोचा सिनेमा मी काढेल…”
दरम्यान, सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ (Marathi Movie Deool Band) या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. पहिल्या भागात गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) यानं राघव शास्त्रींची मध्यवर्ती भूमिका साकारलेली. त्यामुळे दुसऱ्या भागातही कथा त्याच पात्राभोवती फिरणार, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Director Pravin Tarde) यांनी मात्र, यावेळी कथाच बदलली आणि त्यासोबतच सिनेमातलं मुख्य पात्रसुद्धा बदललं. या सिनेमात एका शेतकरी महिलेची व्यथा मांडण्यात आलेली. यावेळी सिनेमात अभिनेत्री स्नेहल तरडे म्हणजेच, दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पत्नी मुख्य भूमिकेत झळकली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव