Singer Kumar Sanus Son tested corona positive: प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर (Singer) कुमार सानूचा (Kumar Sanu) मुलगा जान कुमार हा कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जान कुमार सानू हा देखील एक प्रसिद्ध सिंगर आहे. अलिकडेच त्याची प्रकृती खालवली असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात (Corona) पाठवण्यात आलं आहे. अलिकडेच त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने आपल्या हेल्थबाबत (Kumar Jaan) अपडेट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशमधून कोरोनाचे 5 नवे रुग्ण सापडले. अलिकडेच कडप्पा जिल्ह्यातील 46 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला होता, त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
जान कुमारने व्हिडीओ शेअर करत कोरोना झाला असल्याची माहिती दिली (Kumar Sanu Son shared video on corona from hospital)
जान कुमार सानूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘चीनसे आया मेरा दोस्त.. कोव्हिड को सलाम करो’, असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं. त्याने हॉस्पिटलमधील व्हिडीओ शेअर केला आहे. कुमार सानूच्या मुलाने शेअर केलेल्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सिंगरची तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थन करत आहे.
जान कुमारचे पॅरेट्स कोण? (Jaan Kumar Tested Corona Positive)
जान कुमारबाबत बोलायचं झाल्यास, तो कुमार सानू आणि त्यांची पहिली पत्नी रीटा भट्टाचार्या यांचा मुलगा आहे. माहितीनुसार, कुमार सानू आणि रीटा यांनी 1986 साली लग्न केले होते. परंतु, त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. 1994 साली त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघेही एकमेकांशी विभक्त झाले. त्यानंतर कुमार सानूने 2001 साली दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. 2001 साली त्यांनी सलोनी भट्टाचार्याशी लग्न केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव