सावध व्हा… बायको जेम्स बाँड बनतेय, GPS लावून नवऱ्याचा पाठलाग; हॉटेलात पोचल्यावर नको ते दिसलं, त्यानंतर तांडव – Marathi News | GPS Tracker Exposes Cheating Husband: Hapur Hotel Drama Goes Viral


पती दुसऱ्या महिलेसोबत दिसला, बायकोने धू धू धुतला

नवरा-बायकोचं नातं हे विश्वासावर आधारित असतं. पण त्याचा विश्वासाला तडा गेला तर तो कधीच सांधता येत नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या हापूडमध्ये घडला. उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये एका पत्नीने पतीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी असा डाव आखला की, त्यातून थेट हायव्होल्टेज ड्रामा घडला. पतीच्या गाडीत बसवलेल्या GPS ट्रॅकरने त्याला थेट एका हॉटेलपर्यंत पोहोचवलं आणि पुढे जे घडलं, त्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. बागपत येथील एका महिलेचा दावा आहे की, तिला पतीच्या वागण्यात बदल जाणवत होता. पतीच्या चारित्र्यावर संशय वाढल्यानंतर तिने आपल्या दिराच्या मदतीने त्याच्या कारमध्ये GPS ट्रॅकर बसवला. त्यानंतर ती पतीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागली.

रविवारी तिचा पती नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला… पण यावेळी पत्नीही सज्ज होती. GPSच्या सिग्नलचा पाठलाग करत ती आपल्या कुटुंबीयांसह थेट हापूडच्या मोदीनगर रोडवरील बांके बिहारी हॉटेलमध्ये पोहोचली. आणि तिथे दिसलं ते पाहून पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. हॉटेलमध्ये आपला पती एका दुसऱ्याच महिलेसोबत असल्याचं तिला आढळलं. क्षणात तिथलं वातावरण बदललं… प्रश्नांचा भडिमार सुरू झाला… आणि काही वेळातच वादाचं रूपांतर मोठ्या गोंधळात झालं.

हॉटेलमध्ये हंगामा, रस्त्यावर तमाशा!

पतीला कथित प्रेयसीसोबत पाहिल्यानंतर पत्नी आणि तिच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. हॉटेलच्या आवारात जोरदार वाद झाला आणि पतीला मारहाण करण्यात आली असा आरोप आहे. मात्र, हा ड्रामा इथेच थांबला नाही. हॉटेलपासून सुरू झालेला वाद रस्त्यावर आला. गर्दी जमा झाली, लोकांनी मोबाईल कॅमेरे बाहेर काढले आणि संपूर्ण घटना सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही पक्षांना ताब्यात घेत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नेलं. शांतताभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली.

पतीला केली मारहाण

पोलिसांच्या कारवाईनंतर पतीला SDM न्यायालयातून जामीन मिळाला. मात्र, न्यायालयाच्या आवारातच पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. पत्नीने तिथेच पतीला जाब विचारला आणि तिथेच त्याला धु धु धुतला, असंही समोर आलं.

त्यानंतर त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. त्यात असा दावा केला की, पतीसोबत आढळलेली महिला बुलंदशहर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते, स्थानिकांनीही तीच कहाणी सांगितली. मात्र या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, हापूड पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून, दोन्ही बाजूंच्या तक्रारी आणि आरोपांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *