Nitin Gadkari on Ethanol: इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी


Nitin Gadkari on Ethanol: केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा इंधनातील इथेनॉल (Ethanol news) वापराचे जोरदार समर्थन केले आहे. ‘एबीपी माझा’च्या सन्मान सोहळ्यामध्येही त्यांनी या निर्णयाचे ठासून समर्थन केले. भारत दरवर्षी 22 लाख कोटींचे इंधन (Fuel) आयात करतो. इथेनॉल वापरामुळे त्याला पर्याय मिळेल, असे ते म्हणाले. सोशल मिडीयावर सुरु असलेली टीका हे पेड कँपेन आहे आणि इंधन आयातदार लोकांकडून ते चालवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. (Maharashtra Politics news)

आपल्या देशात दरवर्षी आपण 22 लाख कोटी रुपयांचं फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल,डिझेल आणि गॅस आयात करतो. मी केंद्रीय परिवहनमंत्री असल्यामुळे सांगतोय की, देशातील 40 टक्के वायू प्रदूषण हे वाहनांमुळे होते. इराण आणि अमेरिका युद्धामुळे आपल्यावर काय परिस्थिती ओढवली हे सगळ्यांना माहिती आहे. आपण आत्मनिर्भर भारत झालं पाहिजे, देशात पर्यायी इंधन किंवा बायोफ्युएल तयार झालं पाहिजे याचा मी 2004 पासून पाठपुरावा करत आहे. मी केवळ इथेनॉलचं बोलत नाही. माझ्याकडे इथेनॉल, हायड्रोजन गाडी आहे. या देशात मी इलेक्ट्रिक वाहने आणली, इलेक्ट्रिक कार बाईक आणि ट्रॅक्टर आणला. भारत ऑटोमोबाईल क्षेत्रात जगातील सातव्या क्रमांकाचा देश होता. पर्यायी इंधन किंवा बायोफ्युएलमुळे आपण तिसऱ्या नंबर पोहोचलो, जपानला मागे टाकलं. इथेनॉलबाबत माझ्याबाबत जो प्रचार होतो आहे, ते पेड कँपेन आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

देशात दरवर्षी 1500 कोटी लिटर इथेनॉल लागते. इंधनात इथेनॉलचा वापर सुरु होण्यापूर्वी आम्ही आमच्या कारखान्यात अल्कोहोल तयार करायचो. इथेनॉलचा दर सरकार ठरवते, सरकार टेंडर काढून ते विकत घेते. पुढील पाच ते सहा महिन्यांत आपल्या देशातील शेतकरी एव्हिएशन फ्युएल म्हणून विमानांना इंधन पुरवतील. शेतकरी अन्नदाता नव्हे इंधनदाता होईल, असा दावा नितीन गडकरी यांनी केला. 

Nitin Gadkari on Fuel: इंधन आयात करणाऱ्या लॉबीकडून माझ्याविरोधात मोहीम: नितीन गडकरी

इथेनॉल, मिथेनॉल आणि विविध बायोफ्युएलमुळे आपल्या देशाची इंधनासाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. देशात दरवर्षी 23 लाख कोटी रुपयांच्या इंधनाची आयात केली जाते. याचे टेंडर्स खासगी लोकांना मिळतात. इथेनॉलमुळे मी त्यांचा बिझनेस बंद करेन, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे ही लॉबी माझ्यावर नाराज आहे. पण मला त्याची फिकीर नाही. मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. रस्त्याने हत्ती चालत असला की कुत्रे भुंकतात. मी या सगळ्याची चिंता करत नाही. कारण या आरोपांमध्ये सत्यता नाही, असे नितीन गडकरी यांनी ठणकावून सांगितले.

आणखी वाचा

इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *