Prasad Vedpathak White Line Controversy: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) यांनं काही दिवसांपूर्वी त्याच्या सोसायटीतील जैन कुटुंबीयांनी (Jain Family) इमारतीच्या आवारात मारलेल्या पांढऱ्या पट्टीचा (White Line Controversy) मुद्दा उचलून धरलेला. त्यानंतर त्याच्या सोसायटीतील पांढरी पट्टी हटवण्यात आली आणि त्यानं “माझ्यासाठी हा विषय संपला…”, अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. पण, त्यानंतरच खऱ्या वादाला तोंड फुटलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) यानं उचललेला पांढऱ्या पट्टीचा मुद्दा अख्ख्या मुंबईभर (Mumbai News) चिघळला आणि त्याला राजकीय वलयसुद्धा मिळालं. मनसेनं (MNS) पांढऱ्या पट्टीचा मुद्दा लावून धरला. आधी घाटकोपर (Ghatkopar) मग दादर (Dadar), गिरगाव (Girgaon) आणि लालबागमध्ये (Lalbaug) पांढऱ्या पट्ट्या दिसल्या आणि मराठी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर ठिकठिकाणच्या पांढऱ्या पट्ट्या हटवण्यात आल्या. पण, या सगळ्या प्रकरणाची सुरुवात प्रसाद वेदपाठक आणि त्याच्या सोसायटीपासून सुरू झाली. अशातच आता प्रसाद वेदपाठक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक याच्याविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपरमधील ज्या ‘कैलास अवेन्यू’ सोसायटीमध्ये प्रसाद वेदपाठक राहतो, त्याच सोसायटीमधील एका महिलेनं हा गुन्हा दाखल केला आहे. वकील कृपा याज्ञिक असं त्यांचं नाव आहे.
माध्यमांशी बोलताना वकील कृपा याज्ञिक म्हणाल्या की, “प्रसाद वेदपाठक यांनी सोसायटीमध्ये जैन साधु आणि साध्वींसाठी मारण्यात आलेली पांढरी पट्टी त्यावर आक्षेप व्यक्त करत मुद्दा लावून धरला होता. त्यावेळी त्यांनी मलाही यावर माझं मत विचारलेलं कारण मी हिंदू आहे, तिथूनच सगळं सुरू झालं. मी त्यावेळी त्यांना सांगितलं की, यामध्ये मला काहीही गैर वाटत नाही, कुणाला जर यामुळे मदत होत असेल, तर मला यात काहीच गैर वाटत नाही. धर्म यात आणायची गरज नाही. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचं असंच मत आहे की, मी ‘जैन जिहादी’ यांना मी साथ दिली, त्यांची बाजू घेतली… जेव्हा-जेव्हा आमचं बोलणं झालं, तेव्हा-तेव्हा त्यांचं माझ्याबाबतचं मत हेच होतं…”
“प्रसाद वेदपाठक यांनी मला शिवीगाळ केलीय…”
“हे प्रकरण संपल्यानंतरही 10 जून रोजी अनेकांनी इन्स्टावर मास रिपोर्ट करायला सुरुवात केलेली. त्यात मीसुद्धा सहभागी झालेले. पण, त्यानंतर ताबोडतोब त्यांनी मलाही टार्गेट करायला सुरुवात केली. त्यांनी सर्वात आधी म्हटलं की, तू माफी माग… तू हिंदू असून तू असं केलंयस, तर तू माफी माग… नाहीतर तुला खूप भोगावं लागेल… मी त्यांना सांगितलं की, मी चुकीचं काहीही केलेलं नाही, मी घाबरत नाही, मी माफी मागणार नाही, असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी खूप शिवीगाळ केली, माझ्या प्रोफेशनवर शिवीगाळ केली… ते एवढ्यावरच थांबले नाहीत, ते माझ्या घरी आले आणि भांडले, माझ्यासाठी आक्षेपार्ह्य शब्द बापरले, तिथेही माझ्या प्रोफेशनला टार्गेट केलं….”, असं तक्रारदार कृपा याज्ञिक म्हणाल्यात.
पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका आहे तरी काय? (Prasad Vedpathak Controversy)
कंटेट क्रिएटर आणि यूट्यूबर प्रसाद वेदपाठकनं जैन धर्मगुरुंसाठी घाटकोपरमधील ‘कैलास अव्हेन्यू’ सोसायटीच्या आवारात मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा विरोध केला होता. प्रसादच्या म्हणण्यानुसार, सोसायटीतील सदस्यांची परवानगी न घेता त्यांनी ही पांढरी पट्टी मारली होती. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा त्यानं आपल्या व्हिडीओतून केला. प्रसादनं या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठवला. तसेच व्हिडीओच्या माध्यमातून याची माहिती दिली. वाढत्या वादानंतर ती पांढरी पट्टी काढण्यात आली. दरम्यान, या प्रकरणानंतर त्याला धमक्या मिळत असल्याचं त्यानं सांगितलं. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यानं ट्विट केलं होतं. हे प्रकरण इतकं व्हायरल झालं की, थेट मनसे दरबारीपर्यंत पोहोचलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष