Actor Sunil Grover Video Goes Viral: फुटपाथवर चादर अंथरुन झोपलाय बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता; व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते हैराण, काय झालं? कुणाला कळेना…


Actor Sunil Grover Video Goes Viral: अभिनेता (Actor) आणि प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर (Comedian Sunil Grover) लोकांना आश्चर्यचकित करण्याची एकही संधी सोडत नाही. ग्लॅमरच्या जगात वावरत असूनही, आपल्या विनोदी अभिनयानं आणि मिमिक्रीनं लोकांची मनं जिंकणारा सुनील ग्रोव्हर खऱ्या आयुष्यातही तितकाच डाऊन टू अर्थ आहे. अनेकदा तो आपल्या कृतीनं चाहत्यांची मनं जिंकतोच, तर अनेकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का देतो. सुनील ग्रोवरच्या वागण्यानं अनेक सेलिब्रिटीही अवाक् होतात. कधी तो उसाचा रस काढताना, कधी रस्त्याकडच्या टपरीवर चहा बनवताना, तर कधी इस्त्रीवाल्याच्या दुकानात कपड्यांना इस्त्री करताना दिसतो. पण, आता सुनील ग्रोवर ज्या अवस्थेत चाहत्यांना दिसलाय, ते पाहून सारे हैराण झालेत. सुनील ग्रोव्हर गरजू आणि इतर लोकांसोबत फुटपाथवर झोपलेला दिसलाय. सुनीलवर ही वेळ का आलीय, त्याच्यासोबत काही घडलं तर नाही ना? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.  

सुनील ग्रोव्हरने ऋषिकेशमधील त्रिवेणी घाटावरील एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तो इतर लोकांसोबत फुटपाथवर झोपलेला दिसतोय. झोपण्यासाठी त्यानं जमिनीवर एक चादर अंथरली होती आणि त्याच्या शेजारीच पायातल्या चपला ठेवलेल्या. हा व्हिडीओ शेअर करताना सुनील ग्रोव्हरनं त्याला ‘तारे जमीन पर’ असं कॅप्शन दिलंय.

सुनील ग्रोवरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव 

सुनील ग्रोव्हरचा साधेपणा चाहत्यांना नेहमीच भावतो. त्याच्या अत्यंत साध्या आणि नम्र स्वभावानं त्यानं सर्वांची मनं जिंकलीत. त्याच्या जमिनीशी जोडलेल्या स्वभावाचं आणि साधेपणाचं लोकांना आश्चर्य वाटलंय, तो नक्की कसा माणूस आहे? याचं त्यांना नेहमीच कुतूहल वाटतं. त्यांनी त्याला आपला आवडता कलाकार मानलंय. एका चाहत्यानं लिहिलंय की, “एक अद्भूत माणूस आणि आवडता कलाकार…” आणखी एका चाहत्यानं लिहिलंय की, “म्हणूनच तर सगळे तुझ्यावर प्रेम करतात…” आणखी एका युजरनं म्हटलंय की, “तो किती साध्या स्वभावाचा माणूस आहे…” आणखी एकानं म्हटलंय की, “अरे, माझ्याकडे एकच हृदय आहे, तू किती वेळा जिंकणार? जय महाकाल, हर हर महादेव.” एका कमेंटमध्ये म्हटलंय की, “एक विलक्षण दृश्य, प्रचंड संपत्ती आणि प्रसिद्धी असूनही अहंकाराचा लवलेशही नाही…” आणखी एकानं म्हटलंय की, “जमिनीशी जोडलेली व्यक्ती आणि एक उत्कृष्ट कलाकार, मिस्टर गुलाटी…”

आज सुनील ग्रोव्हरनं इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये त्यानं कादर खान आणि आमीर खान यांच्यापासून ते डोनाल्ड ट्रम्प, गुलजार, जावेद अख्तर आणि सलमान खान यांच्यापर्यंत विविध व्यक्तिरेखा इतक्या उत्कृष्टपणे साकारल्यात. तरीही, पडद्यावरील त्यांच्या व्यक्तिमत्त्वापलीकडे, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. त्याची साधी, जीवनशैली सर्वांची मनं जिंकते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ranbir Kapoor Ramayana Clash With Rajinikanth Jailer 2: 4000 कोटींच्या ‘रामायण’ची ‘थलाइवा’शी टक्कर? दिवाळी 2026 ला बॉक्स ऑफिसवर ‘महाक्लॅश’, चाहत्यांची उत्सुकता शिगेला, तर निर्मात्यांना घाम फुटला

ABP Majha च्या बातम्या LIVE





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *