Pune News: लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, पाहुण्यांसाठी 2 विशेष विमाने; पण ‘त्या’ एका चुकीने लग्नाआधीच केतनचा लोहगडवर दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?


Pune News: पुण्यातील ट्रेकर्सचे आवडते ठिकाण असलेल्या लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गडावर गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अग्रवाल (वय 24) असे या मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (18 जून) सकाळी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Pune News: वाढदिवसाचा आनंद क्षणात बदलला शोकात

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा गुरुवारी वाढदिवस (Birthday) होता. हा दिवस खास करण्यासाठी त्या दोघांनी सकाळीच लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी (Trekking) जाण्याचा बेत आखला होता. दोघेही सकाळी लवकर गडावर पोहोचले. किल्ल्यावर भटकंती सुरू असताना आनंदाचे हे क्षण मोबाईल कॅमेऱ्यात टिपले जात होते. किल्ल्यावरील दरीच्या बाजूला उभे राहून केतन एका फोटोसाठी पोज देत होता. मात्र, गडावरील पृष्ठभाग निसरडा झाला होता. फोटो काढत असतानाच अचानक निसरड्या जागेवरून केतनचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला.

Pune News: होणाऱ्या पत्नीचा मदतीसाठी आरडाओरडा

केतन डोळ्यादेखत दरीत कोसळल्याचे पाहून त्याच्या होणाऱ्या पत्नीने मदतीसाठी एकच आरडाओरडा केला. गडावरील इतर पर्यटकांनी आणि उपस्थितांनी या घटनेची माहिती तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना (Lonavala Rural Police) दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ ‘शिवदुर्ग रेस्क्यू टीम’ (Shivdurg Rescue Team) आणि ‘मावळ वन्यजीव पथकाला’ (Mawal Wildlife Team) पाचारण केले. बचाव पथकाने दरीत उतरून शर्थीचे प्रयत्न करत केतनला बाहेर काढले. मात्र, दरीत कोसळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Pune News: नोव्हेंबर महिन्यात होणार होते लग्न

विशेष म्हणजे, मृत केतन आणि त्या तरुणीचा विवाह निश्चित झाला होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात दोघेही लग्नाच्या बोहल्यावर चढणार होते. ज्या मुलीसोबत नवीन आयुष्याची सुरुवात करायची होती, तिच्याच वाढदिवशी निसर्गाच्या सानिध्यात आनंद साजरा करायला गेलेल्या केतनवर काळाने घाला घातला. या धक्कादायक घटनेमुळे वाढदिवसाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात मोठ्या शोकाकुळ वातावरणात झाले. दरम्यान, लग्नासाठी त्याच्या कुटुंबीयांनी जयपूर येथे 17 कोटी रुपये खर्च करून पॅलेस बुक केले होते. तर पाहुण्यांना जयपूर येथे घेऊन जाण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय देखील केली होती अशी माहिती मिळाली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Pune Crime : गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी पुण्यातील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक; 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *