Sanjay Raut : ”शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांची वाट पाहत होतो”, कोण आहे तो खासदार ज्याच्यावर राऊतांचा होता विश्वास | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Sanjay Raut: बैठकीच्या अखेरच्या क्षणापर्यंत एका खासदाराची प्रतिक्षा शिवसेना ठाकरे गटाला होती. संजय राऊत यांनी यावर थेट भाष्य केले. आम्ही शेवटपर्यंत त्या खासदाराची वाट पाहत होतो. तो खासदार आला नसल्याचे राऊतांनी सांगितले.

''शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांची वाट पाहत होतो'', कोण आहे तो खासदार ज्याच्यावर राऊतांचा होता विश्वास
”शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांची वाट पाहत होतो”, कोण आहे तो खासदार ज्याच्यावर राऊतांचा होता विश्वास

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाने गुरुवारी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीकडे सहा खासदारांनी पाठ फिरवली. व्हीप बजावूनही खासदार उपस्थित न झाल्याने ठाकरे गटात ही फूट पडणे अटळ मानली जात आहे. ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत लोकसभेचे तीनच खासदार उपस्थित राहिले होते. बैठकीच्या अखेरच्या क्षणापर्यंत एका खासदाराची प्रतिक्षा शिवसेना ठाकरे गटाला होती. संजय राऊत यांनी यावर थेट भाष्य केले. आम्ही शेवटपर्यंत त्या खासदाराची वाट पाहत होतो. तो खासदार आला नसल्याचे राऊतांनी सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेनेचा वर्धापन दिन एका विशिष्ट काळात होत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील. त्याशिवाय, इतरही काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. शिवसेनेच्या वाटचालीत गद्दारीचे प्रसंग आले आहेत. या गद्दारीविरोधात शिवसैनिक लढत राहिला आहे. राज्यातील अनेक चळवळींना गद्दाराचा शाप लागल्याचा इतिहास असल्याचे शिवसेना नेते राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी पक्षात झालेल्या बंडाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, शिवसेना फुटली असे म्हणत नाही…एखाद्या विचारासाठी माणूस बाहेर पडतो. पण, जर एकाने स्वतला बाजारात लिलावासाठी उभं केलं आणि लीलाव केला… त्यांनी स्वत:ला विकले असे म्हणावे लागेल असा बोचरा वार संजय राऊत यांनी केला.

त्या खासदाराची वाट पाहिली….

बुधवारी, दिल्लीत झालेल्या खासदारांच्या बैठकीत ठाकरे गटाला एक खासदार माघारी येण्याची शक्यता वाटत होती. संजय राऊत यांनी सांगितले की, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील हे बैठकीला येतील अशी आमची अपेक्षा होती. संजय पाटील यांनी पक्षातून बाहेर पडण्याचे काहीही कारण नव्हते, असे राऊत यांनी म्हटले.

पाटलांचा हट्ट पुरवला…

संजय राऊत यांनी म्हटले की,संजय दीना पाटील यांच्या आग्रहामुळे त्यांच्या मुलीला महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली. त्या ठिकाणी शिवसेना-मनसेच्या महिला उमेदवार होत्या. मात्र,संजय पाटील यांची मुलगी राजूल हिला उमेदवारी देण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. संजय पाटील यांची कन्या राजूल या ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत. वडिलांनी पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत दिले असले तरी राजूल यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना आपण ठाकरेंसोबत असल्याचे संकेत दिले.

मंत्रिपद नाही त्याला २५ कोटी जास्त मिळणार…

संजयर राऊत यांनी सांगितले की बंडखोरांसोबत गेलल्या खासदाराला केंद्रात मंत्रिपद एकाला मिळणार. तर, उर्वरित बंडखोर खासदारा अतिरिक्त २५ कोटी मिळणार असल्याचे माहिती आम्हाला मिळाली असल्याचे राऊत यांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Sanjay Raut : ”शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांची वाट पाहत होतो”, कोण आहे तो खासदार ज्याच्यावर राऊतांचा होता विश्वास



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *