Abhijeet Dipke Rodies Audition:अभिजीत दिपके रोडीजच्या ऑडिशनला, रघूने शिवीगाळ करुन हाकललं? त्या व्हायरल व्हिडीओबाबत रघुराम स्पष्टच म्हणाला…


Raghuram on Abhijeet Dipke Rodies Clip Viral: गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टी (CJP) देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अलीकडेच दिल्लीतील जंतर मंतर (Jantar Mantar) येथे आंदोलन केल्यानंतर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेले शांततापूर्ण देशव्यापी आंदोलन रविवारी बंगळूरमध्ये झाले. सोशल मीडियातून कोट्यवधी फॉलोवर्स बनवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात तरुणाईला आपल्या बाजूने खेचलं. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये  ‘MTV रोडीज’ चे माजी परीक्षक रघूराम (Raghuram),  ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांना शिवीगाळ करून बाहेर हाकलताना दिसत असल्याचा दावा केला जातोय. या व्हायरल व्हिडिओवर रघु राम यांनी व्हिडिओ करत ‘तो’ व्हिडिओ शेअर करणाऱ्यांची खिल्ली उडवली आहे.  यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी कमेंट करत ‘मी तेव्हा शाळेत होतो ‘ असं लिहिलंय. त्यामुळे रघुराम यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होतोय. 

Abhijeet Dipke Rodies Video: नेमकं प्रकरण काय?

अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये असं दावा करण्यात आलाय की एमटीव्ही रोडीजचे माजी परीक्षक रघूराम यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचा शिवीगाळ करून धक्के मारून बाहेर हाकललं. हा व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये येत असल्याचं पाहून रघुराम यांनी व्हिडिओ करत हा व्हिडिओ फेक असल्याचा सांगत हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले ‘मला असं सांगितलं जात आहे की रोडीजमधील माझा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये मी कोणावर तरी रागवत आहे.चिडत आहे.कुणालातरी बाहेर धक्के मारून हाकलून देताना दिसतोय. हा व्हिडिओ आजकाल ट्रेंड होत आहे. काही जणांचा असा दावा आहे की,मी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचा इंटरव्यू आहे. फेक.मी कधीही त्याला भेटलो नाही.ज्या लोकांनी हा व्हिडिओ पसरवण्याचा प्रयत्न केलाय,आणि जे लोक या व्हिडिओवर विश्वास ठेवतात ..तुम्ही या झुरळांना किती घाबरता यार ? खोटं बोलून तुम्ही त्यांच्या बोलण्याचं खंडन करण्याचे प्रयत्न करताय.तुमच्याकडे खरंच बोलण्यासारखं दुसरं काहीच नाही ?

व्हिडिओवर अभिजीत दिपकेंची कमेंट

हा व्हिडिओ अपलोड होताच त्यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं ‘मी तेव्हा शाळेत होतो’ यावर रघुरामनेही मिश्किल प्रतिक्रिया दिलीये. अभिजीत दीपक यांच्या कमेंट वर रघुराम यांनी लिहिलं ‘ वाचलास तू! हा हा ..विनोद बाजूला ठेव ..तुला तुझ्या मिशनसाठी खूप शुभेच्छा. रिस्पेक्ट ‘ असं त्याने लिहिलं. त्यामुळे या व्हिडिओची आणि अभिजीत दिपके आणि रघुराम यांच्या कमेंट्सची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.अनेकांनी रघुराम यांच्या खरेपणाची तारीफ केली आहे. 

Abhijeet Dipke Rodies Audition:अभिजीत दिपके रोडीजच्या ऑडिशनला, रघूने शिवीगाळ करुन हाकललं? त्या व्हायरल व्हिडीओबाबत रघुराम स्पष्टच म्हणाला...

नेमकं काय होतं या जुन्या ऑडिशन क्लिपमध्ये?

रघुराम यांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी रोडीच्या एका जुन्या ऑडिशनची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.यामध्ये दिसणारा स्पर्धका कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके असल्याचा दावा करण्यात आला होता.या व्हिडिओमध्ये एका जोरदार वादा दरम्यान रघुराम यांचा संयम सुटतो.

 

स्पर्धकाला ओरडताना दिसतात. ‘आज पासून तू माझ्याकडे पाहू नकोस. आणि आयुष्यातही कधीच नाही ‘ दरम्यान स्पर्धक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो आणि ‘माझी चूक काय झाली ते सांगा’ असं म्हणतो ‘

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *