Pakistan Squad vs Aus ODI Series : बाबर आजम IN, मोहम्मद रिझवान OUT…; पाकिस्तान संघात मोठी उलथापालथ, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी ODI टीमची घोषणा, कर्णधार कोण?


Pakistan ODI Squad Australia Series : पाकिस्तानच्या (Pakistan) निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या घरच्या वनडे मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर करत मोठे बदल केले आहेत. 30 मेपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी संघात स्टार फलंदाज बाबर आझमचं (Babar Azam) पुनरागमन झालं आहे. मात्र अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) संघाबाहेर करण्यात आले आहे. वनडे संघाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी करणार आहेत.

मोहम्मद रिझवान बाहेर

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 0-2 अशी लाजिरवाणी हार पत्करावी लागल्यानंतर लगेचच हा संघ जाहीर करण्यात आला. त्या मालिकेत रिजवान हा पाकिस्तानसाठी झुंज देणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये होता. मात्र वनडे क्रिकेटमधील अलीकडच्या खराब फॉर्मची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. मार्चमध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने तीन सामन्यांत फक्त 58 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी रिजवानने 17 वनडे सामन्यांत 43.76 च्या सरासरीने 569 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाकिस्तान क्रिकेटमधील अस्थिर निवड धोरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

पाकिस्तान संघात मोठी उलथापालथ

दरम्यान, बाबर आझमच्या पुनरागमनावरही चर्चा रंगली आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर त्याला मार्चमध्ये बांगलादेश मालिकेतून वगळण्यात आले होते. मात्र आता टॉप ऑर्डर मजबूत करण्यासाठी त्याची पुन्हा निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 2025 मधील त्याची वनडे कामगिरी उत्कृष्ट होती. बाबरने 17 सामन्यांत 77.16 च्या सरासरीने 544 धावा केल्या होत्या. 

रिजवानच्या अनुपस्थितीत निवड समितीने यष्टीरक्षक म्हणून मोहम्मद गाझी गोरी आणि अनकॅप्ड रोहेल नझीर यांना संधी दिली आहे. उस्मान खानच्या नावाचाही विचार करण्यात आला होता, पण आजारपणामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता. याशिवाय नसीम शाह, शादाब खान आणि सुफियान मुकीम यांसारख्या स्टार खेळाडूंचेही संघात पुनरागमन झाले आहे. मार्चमधील बांगलादेश दौऱ्यात हे खेळाडू संघात नव्हते.

पाकिस्तानचा एकदिवसीय संघ :

शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), सलमान अली आगा (उपकर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, अहमद दानियाल, अराफत मिन्हास, बाबर आझम, हरिस रौफ, माझ सदाकत, मोहम्मद गाझी घोरी (यष्टीरक्षक), नसीम शाह, रोहेल नजीर (यष्टीरक्षक), साहिबजादा फरहान, शादाब खान, शमिल हुसेन आणि सुफयान मुकीम.

एकदिवसीय मालिकांचे वेळापत्रक

30 मे – पहिला एकदिवसीय सामना, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
2 जून – दुसरा एकदिवसीय सामना, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
4 जून – तिसरा एकदिवसीय सामना, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

हे ही वाचा – 

IPL 2026 Playoff Scenarios : 4 संघ… 4 सामने… पण तिकीट फक्त एकाचं! IPL पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट; शेवटच्या क्षणी बदलणार संपूर्ण खेळ

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *