मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील खासदार फुटीनंतर आता मनसेतूनही महापालिका निवडणूकीत झालेल्या जागावाटपावरुन नाराजीचा सूर दिसून येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर केलेले संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांची मुलगी राजुल पाटील यांना महापालिका निवडणूकीत भांडुपला दिलेली जागा ही चूकीचीच ठरली असल्याचं मनसेकडून सांगितलं जात आहे. ती जागा मनसेचीच होती; मनसेकडून अनिषा माजगांवकर निवडून आल्या असत्या असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे.(Yashwant Killedar MNS)
Yashwant Killedar MNS : राजुल पाटील एकट्या बाहेर पडल्या तर….
यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं की, दर महिन्याला मनसे नगरसेवकांची आढावा बैठक होते. मनसेचा ठसा महापालिका कामकाजात दिसला पाहिजे. विरोधी पक्षांना अल्प निधी दिला जातोय. सगळे प्रश्न उभे असतांना तोडफोड राजकारण सुरु आहे. मात्र महापालिकेत ऑपरेशन टायगर होणार असल्याचा खोटा दावा केला जातो आहे, असं आजिबात वातावरण नाही. महापालिकेत असा प्रयत्न केला गेला तरी यशस्वी होणार नाही. खासदारांमुळे आत्मविश्वास वाढला असला तरी महापालिकेत यश मिळणार नाही. तर संजय दीना पाटलांनी स्वत:च्या मुलीसाठी प्रतिष्टेचा मुद्दा केला. संजय दीना पाटील खोटं बोलतायेत. जर राजुल पाटील एकट्या बाहेर पडल्या तर अपात्र होतील. जिथे संजय दिना पाटलांची मुलगी राजुल पाटील निवडून आल्या ती जागा आमचीच होती. अनिशा माजगांवकर जर अपक्ष राहून चांगली मतं घेतात तर त्या ठिकाणी नक्कीच निवडून आल्या असत्या, असंही पुढे यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे. (Yashwant Killedar MNS)
Sandeep Deshpande : मी उद्धव ठाकरे यांना त्यावेळी सांगितलं होतं….
यावरती दोन दिवसांपूर्वी मनसे नेचे संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, आपण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सांगितलं होतं की ती जागा संजय दिना पाटील यांच्या मुलीला देऊ नका, संजय दिना पाटील तुमचा पक्ष सोडून जाणार हे महापालिका निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं, तशी माहिती आधीच मला मिळाली होती. त्यामुळं संजय दीना पाटील यांच्या कन्येला महापालिका तिकीट देऊ नका हे मी उद्धव ठाकरे यांना त्यावेळी सांगितलं होतं. मला आधीच माहिती होती खासदार संजय दिना पाटील हे शिंदे शिवसेनेच्या संपर्कात आहे. आमच्या त्या ठिकाणच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांना मुंबई महापालिकेचे तिकीट द्यावं यासाठी आम्ही आग्रह केला त्यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मी कल्पना दिली की संजय दिना पाटील हे तुमच्या पक्षासोबत राहणार नाहीत, असंही देशपांडे यांनी म्हटलं होतं.(Yashwant Killedar MNS)
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story