Pune Crime Lohagad Accident: कॉल रेकॉर्डस् अन् सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, लोहगडावर बड्या उद्योगपतीच्या मुलाचा मृत्यू, भावी पत्नीने बॉयफ्रेंडसोबत रचला कट


Pune Crime Lohagad Accident: पुण्यातील लोहगडावर काही दिवसांपूर्वी केतन अग्रवाल या तरुणाचा पाय घसरुन मृत्यू झाला होता. केतन हा एका बड्या उद्योगपतीचा मुलगा आहे. पुढील काही दिवसांमध्ये त्याचे लग्न होणार होते. त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिच्या वाढदिवसानिमित्त केतन अग्रवाल हा 18 जून रोजी लोहगडावर (Lohagad Fort)) फिरायला गेला होता. त्यावेळी गडावर एके ठिकाणी फोटो काढताना पाय घसरुन तो तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळला होता. तीन तासांच्या शोध मोहीमेनंतर लोहगडाच्या परिसरातील जंगलातून केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder) याचा मृतदेह हाती लागला होता. केतन अग्रवाल हा पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील मसाले व्यापाऱ्याची मुलगी सिया गोयल हिच्यासोबत त्याचा विवाह ठरला होता. मात्र, लग्नापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. सिया गोयल हिला मात्र केतनसोबत लग्न करायचे नव्हते. त्यामुळे सियाने तिचा मित्र चेतन चौधरी याच्यासोबत कट रचून केतन अग्रवाल याला लोहगडावरुन ढकलून त्याची हत्या केली. (Pune Crime news)

सुरुवातीला पोलिसांनाही केतन अग्रवाल हा लोहगडावरुन पाय घसरुन खाली पडला, असे वाटले होते. मात्र, पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा तांत्रिक यंत्रणा आणि गोपनीय माहितीच्या आधारे केतन अग्रवाल याचा मृत्यू अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले. सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेजण पुण्यातील मार्केट यार्डात व्यवसायही करायचे. मात्र, सियाचे लग्न हे केतन अग्रवालसोबत ठरले होते. तिला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. काही दिवसांपूर्वीच सिया आणि केतन यांचे भांडण झाले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला तेव्हा लोहगडावरील मोबाईलचा डम्प डेटा, लोकेशन आणि या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोहगडाच्या परिसरात एक संशयित तरुण हुडी घालून फिरताना आढळून आला. हेडफोन आणि हुडी घालून हा तरुण चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता. सिया आणि चेतन चौधरी 18 जूनपूर्वीही एकदा लोहगडावर गेले होते. साधारण एक आठवड्यावासून या सगळ्याचे प्लॅनिंग सुरु होते. तर केतन अग्रवाल याच्या मृत्यूच्या दिवशी आधी सिया गोयल ही लोहगडावर गेली. नंतर चेतन चौधरी हा लोहगडावर पोहोचला. यानंतर केतन अग्रवाल हा लोहगडावरुन पाय घसरुन दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

पोलिसांना ही गोष्ट संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी या परिसरातील मोबाईल कॉल रेकॉर्ड, टॉवर लोकेशन आणि इतर पुरावे तपासायला सुरुवात केली. त्यावेळी सिया गोयल हिने चेतन चौधरी आणि त्याच्या मित्रांसह लोहगडावरुन केतन अग्रवाल याला ढकलून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सिया गोयल आणि तिच्या आठ मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.

Royal Wedding in Jaipur: केतन आणि सिया गोयलच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये 17 कोटींचा पॅलेस बुक

केतन अग्रवाल याचा विवाह यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे होणार होता. त्यासाठी तब्बल 17 कोटी रुपये खर्च करुन कुटुंबीयांनी एक आलिशान महालही बुक केला होता. याशिवाय लग्नाच्या वऱ्हाडाला उदयपूरला जाण्यासाठी दोन स्वतंत्र विमानांचेही बुकिंग करण्यात आले होते. केतनचे वडील विशाल अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून त्याच्या पश्चात वडिलांसह आई, बहीण असा परिवार आहे. 18 जूनला ही घटना घडली त्यादिवशी केतनच्या पार्थिवावर निगडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी वाचा

Pune News: लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, पाहुण्यांसाठी 2 विशेष विमाने; पण ‘त्या’ एका चुकीने लग्नाआधीच केतनचा लोहगडवर दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *