लोणावळा/पुणे: लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याचा बनाव रचत करण्यात आलेल्या केतन अग्रवाल या तरुण व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक (Pune Crime news) वळण मिळाले आहे. हा कोणताही अपघात नसून केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिच्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा एक अत्यंत थंड डोक्याने केलेला खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोन्ही मुख्य आरोपींना ताब्यात (Pune Crime news) घेतले असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.(Pune Crime news)
Ketan Agrawal Death: अपघाताची नोंद आणि पोलिसांना आलेला संशय
केतन अग्रवाल हा लोहगड किल्ल्यावरून खाली कोसळल्याची घटना घडल्यानंतर, सुरक्षारक्षक, पोलीस आणि मुलीच्या घरच्यांच्या उपस्थितीत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरुवातीला कलम १९४ (बी.एन.एस.एस.) अंतर्गत अकस्मात मृत्यूची (AD No. 36/2026) नोंद करण्यात आली होती. केतन हा एक नियमित ट्रेकर होता आणि त्याने यापूर्वी अनेक ट्रेक्स केले होते, त्यामुळे त्याचा असा अचानक पाय घसरणे पोलिसांना संशयास्पद वाटत होते. त्यानंतर केतनच्या कुटुंबीयांनीही या मृत्यूबाबत तीव्र संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
Ketan Agrawal Death: तांत्रिक पुरावे आणि ‘लव्ह ट्रँगल’ उघड
मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपनीय माहिती, साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या (CDR, IPDR एनालिसिस आणि सीसीटीव्ही फुटेज) आधारे सखोल तपास सुरू केला. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली की, सिया गोयल हिचे पुणे मार्केट यार्ड परिसरात दुकान असलेल्या चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत गेल्या एका वर्षापासून प्रेमसंबंध होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. या विवाहबंधनात केतन आडकाठी ठरत असल्याने सिया आणि चेतन या दोघांनी मिळून त्याला वाटेतून हटवण्याचा पूर्वनियोजित कट रचला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कलम १०३ (BNS) आणि ६१(२) अंतर्गत खुनाचा गुन्हा (गु.र.नं. १६८/२०२६) दाखल केला आहे. आधिक तपासात त्यांनी कबुली देखील दिली आहे. त्यांचे प्रेमसंबंध होते.
Ketan Agrawal Death: प्री-वेडिंग शूट दरम्यान ‘बाली’ येथे जाताना पासपोर्टची चोरी
पोलीस तपासात यापूर्वी झालेल्या दोन प्रयत्नांची धक्कादायक माहिती समोर आली आहे, जूनच्या पहिल्या आठवड्यात केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी ‘बाली’ (इंडोनेशिया) येथे जाणार होते. ते पुण्यातून मुंबई विमानतळाच्या दिशेने निघालेही होते. मात्र, विमानतळावर पोहोचल्यावर केतनचा पासपोर्ट गायब असल्याचे समजले आणि त्यांना दौरा रद्द करून परत यावे लागले. तपासात उघड झाले की, केतनने बालीला जाऊ नये म्हणून सियाने स्वतःच त्याचा पासपोर्ट चोरून तो कुठेतरी लपवून (Displace) ठेवला होता.
Ketan Agrawal Death: दुसरा आणि तिसरा प्रयत्न: लोहगड किल्ल्यावरील कट
१४ जूनचा अपयशी प्रयत्न: बालीचा बेत फसल्यानंतर, १४ जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही.
१८ जूनला अखेर घातपात केला: १९ जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे १८ जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
Ketan Agrawal Death: दोन्ही कुटुंबे व्यावसायिक पार्श्वभूमीची
मृत केतन अग्रवाल आणि आरोपी सिया गोयल हे दोघेही पुण्यातील अतिशय प्रतिष्ठित आणि मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील आहेत. पुणे शहरात मार्केट यार्ड भागात या दोन्ही कुटुंबांचे मोठे व्यवसाय आहेत. या हाय-प्रोफाइल लग्नासाठी मोठी तयारी सुरू होती, मात्र त्याआधीच हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, “लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास करत असताना पोलिसांना काही संशयास्पद माहिती मिळाली, ज्यावरून घातपाताचा संशय बळावला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, केतन अग्रवालचे जिच्याशी लग्न ठरले होते, त्या सिया गोयल हिचे आणि केतनचे मतभेद होते, कारण सियाला हे लग्न मान्य नव्हते. या प्रकरणातील तिसरा संशयित चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी मिळून केतनचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणातून चेतन चौधरी हा घटनास्थळी म्हणजेच लोहगड किल्ल्यावर उपस्थित असल्याचे समोर आले. घटनेच्या दिवशी आधी सिया केतनला घेऊन किल्ल्यावर गेली आणि त्यानंतर तिचा मित्र चेतन तिथे पोहोचला. १८ जून रोजी ही घटना घडली असली, तरी या हत्येचा कट रचण्याचे काम एक आठवड्यापूर्वीपासूनच सुरू होते. यापूर्वीही त्यांनी लोहगड किल्ल्यावर जाऊन रेकी केली होती. या गुन्ह्यातील अग्रवाल, गोयल आणि चौधरी ही तिन्ही कुटुंबे प्रतिष्ठित व्यापारी क्षेत्रातील असून, सिया गोयल हिचा स्वतःचा व्यवसाय आहे, तर चेतन चौधरीचाही मार्केट यार्डात व्यवसाय आहे. या खळबळजनक हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी मुख्य दोन्ही आरोपींना अटक केली आहे.”
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story