India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्री – Marathi News | Suryansh Shedge replacement for Nitish Kumar Reddy in Indias squads for the upcoming T20I series against Ireland and England


India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्रीImage Credit source: BCCI

अफगाणिस्तानविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली होती. मात्र या दौऱ्याला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्याची वेळ आली. अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नितीशला क्वाड्रिसेप्सची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट शोधावी लागली. बीसीसीआयने एका निवेदनात नितीश कुमार रेड्डीच्या जागेवर सूर्यांश शेडगेचा भारतीय संघात समावेश केल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच नितीश कुमार रेड्डी आयर्लंड आणि इंग्लंड या दोन्ही दौऱ्यांमधून बाहेर असेल. आयर्लंडमधील टी20 मालिकेनंतर नितीश कुमार रेड्डी इंग्लंड दौऱ्यादरम्यान होणाऱ्या व्हाईट बॉल मालिकेतही खेळणार नाही. दुसरीकडे, सूर्यांश शेडगे हा देखील नितीश कुमार रेड्डीप्रमाणेच एक वेगवान अष्टपैलू खेळाडू आहे.

सूर्यांश शेडगेची निवड कशी?

सूर्यांश शेडगे हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने श्रीलंकेत पार पडलेल्या ट्राय सीरिज ए मालिकेत चांगली कामगिरी केली होती. भारत ए संघाकडून खेळताना त्याने पाच सामन्यात सहा षटकार आणि सहा चौकारांसह 147 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोत्तम खेळी ही 72 धावांची होती. सूर्यांश हा ट्राय सीरिज मालिकेत वैभव सूर्यवंशीनंतर दुसरा सर्वाधिक षटकार मारणार फलंदाज ठरला होता. इतकंच काय तर त्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही कमाल केली होती. त्याने दोन विकेट काढल्या होत्या. 2024-2025 मध्ये मुंबईच्या विजयी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मोहिमेतही तो उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता, त्याने खालच्या मधल्या फळीत 251.92 च्या स्ट्राइक रेटने 131 धावा केल्या होत्या. आयपीएल 2026 दरम्यानही सूर्यांश चर्चेत राहिला. त्याने पंजाब किंग्सकडून सात सामने खेळून 12 षटकारांसह 175 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 158 धावा केल्या.

नितीश कुमार रेड्डीचं काय?

नितीश कुमार रेड्डीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला पुनर्वसनाच्या कालावधीची शिफारस केली आहे. त्यामुळे दोन्ही टी20 मालिकांना मुकला आहे. इंग्लंडच्या मागच्या कसोटी दौऱ्यातही दुखापतीमुळे मालिकेच्या मध्यातून माघार घेतली होती. रेड्डीला दुखापतीचा त्रास वारंवार जाणवत असल्याने चिंता वाढली आहे. आयपीएल 2025 मध्येही त्याने फारशी गोलंदाजी केली नव्हती. आयपीएल 2026 मध्ये त्याने गोलंदाजीचा भार वाढवला, पण त्याची तंदुरुस्ती पुन्हा खालावली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *