Raja Shivaji OTT: ‘राजा शिवाजी’ सिनेमाची सिंहगर्जना; थिएटरनंतर आता OTTवर धुमाकूळ घालणार, कधी अन् कुठे रिलीज होणार?


Riteish Deshmukh Raja Shivaji Movie: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या सिनेमाला मराठी प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. वर्ल्डवाईड या सिनेमानं 114.8 कोटींचे कलेक्शन केले आहे.  तर, भारतात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.  दरम्यान, सिनेमागृहांमध्ये (Box Office Collection) मिळालेल्या प्रचंड यशानंतर ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. हा ऐतिहासिक सिनेमा ओटीटीवर (OTT Netflix) कधी रिलीज होणार? जाणून घेऊयात.

‘राजा शिवाजी’ हा सिनेमा कोणत्या ओटीटीवर रिलीज होणार (Raja Shivaji Cinema OTT Release)

‘राजा शिवाजी’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुव्वांधार कमाई केलीये. प्रेक्षकांकडून मिळालेल्या जबरदस्त रिस्पॉन्सनंतर या सिनेमानं आतापर्यंत अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत.  आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.  ज्यांना काही कारणास्तव हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहता आला नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल, हा सिनेमा आता घरबसल्या आपण ओटीटीवर पाहू शकता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 26 जून रोजी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.  हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होणार असून, नेटफ्लिक्स किंवा सिनेमाच्या मेकर्सकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  दरम्यान, ओटीटी रिलीजची तारीख आणि प्लॅटफॉर्मची माहिती  समोर येताच, प्रेक्षक तसेच चाहत्यांना आनंद झाला.

‘राजा शिवाजी’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन? (Raja Shivaji Box Office Collection)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा 75 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे.  भारतात या सिनेमानं  100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटानं 110 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर, वर्ल्डवाईड या सिनेमानं  114.8 कोटींचे कलेक्शन केले आहे.   दरम्यान, या सिनेमानं अनेक रेकॉर्ड्स मोडले असून, मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘वेलकम टू द जंगल’ ते ‘राजा शिवाजी’; विकेंडला मनोरंजनाची मेजवानी, OTT अन् थिएटरमध्ये धुमाकूळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *