Mumbai Student Protest: देशात NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांची आंदोलने, सोनम वांगचुक यांचे आंदोलन आणि शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची युवकांची मागणी यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या विषयाकडे वेधले गेले आहे. अशातच राजधानी दिल्लीत (Delhi) सुरू झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं (Student Protest) आता देशाच्या विविध भागांत पसरली आहेत. केवळ दिल्लीतच नव्हे, तर अनेक शहरांमधील विद्यार्थी निदर्शनं आणि रॅलींचे आयोजन करत आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील आंदोलनांप्रकरणी (Mumbai Student Protest) आतापर्यंत 13 गुन्हे दाखल झाले असून सुमारे 400 जणांवर काल झालेल्या आंदोलन प्रकरणी (22 जुलै) दिवसभरात कारवाई करण्यात आली आहे. तर18 जुलै पासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आतापर्यंत 1200 हून अधिक जणांवर नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबईत काल झालेल्या आंदोलनाची काही वेगळी दृश्य सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात चेंबूरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या पोलिसांच्या पिंजरा बसची एका विद्यार्थ्याने कडी काढली आणि आतमधील सर्व विद्यार्थी क्षणात पोलिसांच्या ताब्यातून मुक्त झाले. तर दुसरीकडे दादरच्या सेना भवन समोर एका बसमध्ये विद्यार्थ्यांना भरल्यानंतर एकट्या मुलीने थेट पोलिसांच्या बसला अडवलं आणि आपल्या सहकारी आंदोलकांना सोडण्याची मागणी केली. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बॉलिवूड मधील सुध्दा काही कलाकार सहभागी झाले होते. ज्यात काल आयशा खान या अभिनेत्रीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. (Mumbai Student Protest Viral Video)
Police were taking the detained students away in a truck from the Chembur student protest.
Then, out of nowhere, an uncle came and opened the truck’s latch, and all the students jumped out and ran away.
Man, I love my country so much sometimes. 😭 pic.twitter.com/M7ZCoIBoHr
— Oppressor (@TyrantOppressor) July 22, 2026
Mumbai Police Actions : मुंबईतील आंदोलनांप्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे; सुमारे 400 जणांवर दिवसभरात कारवाई
मुंबईत 18 जुलै 2026 पासून सुरू असलेल्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 13 गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे. तर काल (22 जुलै) दिवसभरात शिवाजी पार्क आणि चेंबूर येथे करण्यात आलेल्या आंदोलना प्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 गुन्हे दाखल केले आहेत. चेंबूर येथे आंदोलनात सहभागी झालेल्या 400 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे. बेकायदेशीर जमाव, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यात एकूण 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 18 जुलै पासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आतापर्यंत 1200हून अधिक जणांवर नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर